Border 2 : 6 दिवसांत 200 कोटी पार; पण सहाव्या दिवशी 'बॉर्डर 2'ला मोठा झटका
- Published by:Priya Lad
Last Updated:
Border 2 Collection : 'बॉर्डर 2' चित्रपटाचा एकूण प्रवास आता वेगाने ऐतिहासिक ब्लॉकबस्टर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण सहाव्या दिवशी मोठा धक्का बसला आहे.
सनी देओलच्या बॉर्डर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेला ही फिल्म प्रदर्शित झाल्यानंतर 6 दिवस चित्रपटगृहांवर वर्चस्व गाजवत आहे. अवघ्या सहा दिवसांतच या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या प्रभावी कमाईसह 'बॉर्डर 2'ने 'धुरंधर'चा मागील विक्रम मोडला आहे आणि बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा आपलं स्थान निर्माण केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पण तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीच्या आठवड्याच्या शेवटी कामकाजाच्या दिवसांमध्ये अशी घट होणं सामान्य आहे. अवघ्या सहा दिवसांत 213 कोटींची कमाई केली आहे. या प्रभावी आकड्यासह बॉर्डर 2 अलिकडच्या काळातील सर्वात मोठ्या हिंदी हिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. 200 कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार हे जवळजवळ निश्चित आहे.









