advertisement

Baby Girl Name: शंभू-महादेवावरून लाडक्या लेकीला ठेवावी अशी खास नावे; छोटी पण आकर्षक अन् मॉडर्न

Last Updated:

Baby Girl Name on Shiv: मुलीचे नाव ठरवताना आताच्या काळात केवळ आधुनिकतेचा विचार न करता, त्या नावातील ऊर्जा आणि सकारात्मक प्रभावाला अधिक महत्त्व दिले जाते. शिवसंबंधित नावांमध्ये शौर्याचा आणि कोमलतेचा एक सुंदर संगम आढळतो..

News18
News18
मुंबई : हर-हर महादेव.. महादेवाचं नाव घेताच मनामध्ये एक अगाध शक्ती, आत्मबळ आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. शिव म्हणजे केवळ संहाराची देवता नव्हे, तर ते जीवनातील नवीन चैतन्य, सुसंवाद आणि प्रगल्भतेचे मूर्तिमंत रूप आहेत. यामुळेच आजच्या काळातील पालक आपल्या लाडक्या लेकींसाठी महादेवाशी संबंधित नावे निवडण्याकडे अधिक कल दाखवत आहेत. ही नावे केवळ श्रवणीय नसून, त्यामागे एक शक्तिशाली संकल्प आणि आशीर्वादाचा वारसा दडलेला असतो. मुलीचे नाव ठरवताना आताच्या काळात केवळ आधुनिकतेचा विचार न करता, त्या नावातील ऊर्जा आणि सकारात्मक प्रभावाला अधिक महत्त्व दिले जाते. शिवसंबंधित नावांमध्ये शौर्याचा आणि कोमलतेचा एक सुंदर संगम आढळतो, जो मुलीच्या भविष्यातील व्यक्तिमत्त्वाला आणि आत्मविश्वासाला एक नवी दिशा देण्याचे सामर्थ्य मिळते. शंकराशी संबंधित मुलींची नावे आणि अर्थ जाणून घेऊ.
1. शिवा
शिवा हे नाव अतिशय साधे आणि प्रभावी आहे. याचा अर्थ आहे - शुभ आणि कल्याण आणणारी. हे नाव ऐकायला मृदू आहे, पण याचा अर्थ खूप भक्कम आहे. हे नाव मुलीमध्ये सकारात्मक विचार आणि आत्मबळाचे संकेत देते.
2. शिवानी
शिवानी हे नाव खूप लोकप्रिय आहे. याचा अर्थ होतो - देवी पार्वती, जी भगवान शिव यांची शक्ती आहे. या नावामध्ये स्त्रीशक्ती, प्रेम आणि समर्पणाची झलक मिळते.
advertisement
3. गौरी
गौरी हे माता पार्वतीचेच एक रूप आहे. या नावाचा अर्थ आहे - गोरी, उज्ज्वल आणि पवित्र. हे नाव निरागसता आणि सौंदर्याची जाणीव करून देते.
4. रुद्राणी
रुद्राणीचा अर्थ आहे - रुद्र म्हणजेच शिव यांची पत्नी. हे नाव खूप राजेशाही वाटते. यामध्ये ताकद, सन्मान आणि खोलीचा भाव असतो.
5. ईशानी
advertisement
ईशानी नावाचा अर्थ आहे - ईश्वराची शक्ती. हे नाव ऐकायला आधुनिक वाटते आणि आध्यात्मिक ओढ देखील दर्शवते.
6. शांभवी
शांभवी हे महादेवाचे एक नाव आहे आणि शांभवीचा अर्थ आहे - शंभूची शक्ती. हे नाव शांत स्वभाव आणि आंतरिक मजबुती दर्शवते.
7. भवानी
भवानी हे नाव आई दुर्गादेवीचे देखील आहे, जी शिवाची अर्धांगिनी मानली जाते. या नावामध्ये साहस आणि संरक्षणाची भावना लपलेली आहे.
advertisement
8. पार्वती
पार्वती हे नाव पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. हे नाव प्रेम, संयम आणि कुटुंबाशी जोडलेली मूल्ये दर्शवते.
9. महेश्वरी
महेश्वरीचा अर्थ आहे - महेश म्हणजेच शिव यांची शक्ती. हे नाव थोडे पारंपारिक आहे, पण याचा अर्थ खूप मोठा आहे.
advertisement
10. त्रिशा
त्रिशा हे नाव शिवाच्या त्रिशूलाशी संबंधित मानले जाते. याचा अर्थ इच्छा आणि दृढ विचारांशी जोडला जातो.
या नावांची खास वैशिष्ट्ये - महादेवाशा संबंधित नावांमध्ये केवळ धार्मिक भावना नसते, तर ती जीवनातील संतुलनाचा संदेशही देतात. ही नावे मुलीला आतून मजबूत, शांत आणि समजूतदार बनण्याची प्रेरणा देतात. तसेच ही नावे आधुनिक देखील वाटतात, ज्यामुळे मुलीची ओळख वेगळी दिसते. नावाचा परिणाम व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर होतो, असे अनेक लोक मानतात. म्हणूनच नावामध्ये शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा जोडलेली असते, तेव्हा ती आयुष्यभर सोबत राहते.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Baby Girl Name: शंभू-महादेवावरून लाडक्या लेकीला ठेवावी अशी खास नावे; छोटी पण आकर्षक अन् मॉडर्न
Next Article
advertisement
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली; सोने आणणाऱ्यांना बसला मोठा झटका
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली
  • दुबईत सोनं खरेदी करणं आता अशक्य

  • सामान्यांना मोठा झटका

  • सर्व गणितं कोलमडली

View All
advertisement