Myra Vaikul Fees : मायरा वायकुळचा सोशल मीडियाला रामराम! ज्या मालिकेमुळे मिळालं फेम त्याच्या एका एपिसोडसाठी किती घ्यायची फी?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Myra Vaikul Fees : बालकलाकार मायरा वायकुळने सोशल मीडियाला रामराम केला आहे. मायरा मालिकेच्या एका एपिसोडसाठी किती फी घ्यायची माहिती आहे का?
advertisement
advertisement
मायराच्या आई-वडिलांनी मायराचे गमतीशीर आणि गोड व्हिडीओ ती लहान असल्यापासूनच शेअर करायला सुरुवात केली होती. त्यामुळे मायराची सोशल मीडियावरील ओळख लहानपणापासूनच तयार झाली होती. मोठी होत असताना मायरा या सगळ्यात रमली आणि कॅमेरा फ्रेंडली. याच व्हिडीओंमुळे तिची ओळख वाढत गेली आणि पुढे तिला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका मिळाली.
advertisement
advertisement
advertisement
या यशाबरोबरच मायराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मधल्या काळात तिने दिलेल्या काही मुलाखतींमधील तिचं बोलणं आणि उत्तरं ऐकून काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. गेल्या काही महिन्यांपासून मायरा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत होती. याचा मानसिक परिणाम होऊ नये म्हणून तिच्या आई-वडिलांनी एक मोठा निर्णय घेतला.
advertisement








