हिट सिरिअल, जबरदस्त फॅन फॉलोविंग; मग का ट्रोल होते मायरा वैकुळ? ट्रोलिंगला वैतागून सोशल मीडियाच सोडलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Myra Vaikul Quit Social Media: सततचं ट्रोलिंग आणि नेटकऱ्यांच्या आरोपांना कंटाळून मायराचे सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात आले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
"ही मुलगी वयापेक्षा जास्त शहाणी वाटते", "घरून स्क्रिप्ट पाठ करूनच निघते का?", "आमच्या वेळी असं वागलो असतो तर आईने हाणून काढलं असतं" अशा अत्यंत बोचऱ्या कमेंट्स तिच्या व्हिडिओवर येत होत्या. मायराची बोलण्याची ढब, तिचे हावभाव हे लहान मुलांसारखे नसून एखाद्या मोठ्या व्यक्तीसारखे वाटतात, अशी टीका सतत होत होती.
advertisement
advertisement
advertisement
सोशल मीडिया सोडला असला तरी मायराचा अभिनय प्रवास थांबलेला नाही. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत ती लवकरच 'मर्दिनी' या चित्रपटात दिसणार आहे. पण रिल्सच्या दुनियेत जिथे तिला रोज जज केलं जायचं, तिथून मात्र तिने एक्झिट घेतली आहे. मुलांच्या बालपणावर कॅमेऱ्याचा प्रकाश किती असावा, हा नवा वाद आता या निमित्ताने सोशल मीडियावर सुरू झाला आहे.









