advertisement

IND vs NZ : सूर्याने मुद्दामून चौथा टी20 सामना हारला, मॅचनंतर सागितलं खरं कारण

Last Updated:

विशाखापट्टणमच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 165 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे टीम इंडियाचा या सामन्यात 50 धावांनी पराभव झाला होता

sruya kumar yadav
sruya kumar yadav
India vs New Zealand 4th T20I : विशाखापट्टणमच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 165 धावांवर ऑल आऊट झाली होती. त्यामुळे टीम इंडियाचा या सामन्यात 50 धावांनी पराभव झाला होता.न्यूझीलंडने हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत न्यूझीलंडने 3-1 ने आघाडी घेतली आहे. भारताच्या या पराभवावर बोलताना सूर्यकुमार यादवने जी प्रतिक्रिया दिली,ती पाहता त्याने मु्द्दामुन हा सामना हरल्याचे स्पष्ट होत आहे.
सामन्यानंतर भारताच्या या पराभवावर बोलताना सुर्यकुमार यादव म्हणाला की, आज आम्ही जाणूनबुजून सहा फलंदाज खेळवले. आम्हाला पाच परिपूर्ण गोलंदाज हवे होते आणि आम्ही स्वतःला आव्हान देऊ इच्छित होतो. उदाहरणार्थ, जर आपण 200 किंवा 180 धावांचा पाठलाग करत असू आणि आम्हाला पहायचे होते की आम्ही दोन किंवा तीन धावांनी मागे आहोत, तर ते कसे दिसले असते. पण दिवसाच्या शेवटी ते ठीक आहे. आणि आम्हाला विश्वचषक संघाचा भाग असलेल्या सर्व खेळाडूंना खेळवायचे होते म्हणून त्याने हा निर्णय घेतल्याचे सुर्यकुमार यादवने सांगितले. त्यामुळे सूर्याच्या याच निर्णयाने टीम इंडियाचा पराभव झाला.
advertisement
दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याच्या निर्णयावर सूर्या म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करताना खूप चांगली फलंदाजी करत होतो. म्हणून जर आम्ही 180 किंवा 200 धावांचा पाठलाग करत असू आणि दोन किंवा तीन बळी पडले असतील आणि आम्ही कसे फलंदाजी करतो ते पाहावे अशी माझी इच्छा होती. त्यामुळे हे एक चांगले आव्हान आहे. आशा आहे की जर आम्हाला पुढच्या सामन्यात पुन्हा संधी मिळाली तर आम्ही पुन्हा पाठलाग करू शकतो. पण दिवसाच्या शेवटी, चांगले धडे मिळाले. जोरदार दव पडल्याने, मला वाटते की दुबेने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याप्रमाणे, येथे आणि तेथे एक किंवा दोन भागीदारी केल्या असत्या, त्याच्यासोबत एका फलंदाजाने खेळाच्या शेवटी खूप फरक पडला असता. आम्ही 50 धावांनी हरलो पण ते ठीक आहे. मी म्हटल्याप्रमाणे, अशा धावांचा पाठलाग करताना अशा एक किंवा दोन भागीदारी फरक करू शकतात, असे सुर्यकुमार यादवने शेवटी सांगितले.
advertisement
चौथ्या टी20 साठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकु सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवि बिश्नोई,कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग,
न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन : डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर, झॅकरी फॉल्क्स,मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी,
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs NZ : सूर्याने मुद्दामून चौथा टी20 सामना हारला, मॅचनंतर सागितलं खरं कारण
Next Article
advertisement
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली; सोने आणणाऱ्यांना बसला मोठा झटका
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली
  • दुबईत सोनं खरेदी करणं आता अशक्य

  • सामान्यांना मोठा झटका

  • सर्व गणितं कोलमडली

View All
advertisement