advertisement

Skin Cancer : त्वचेचा कर्करोग का होतो ? लक्षणं ओळखा, कारणं समजून घ्या, वेळीच व्हा सावध

Last Updated:

त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे नियमित स्व-तपासणी. कारण अनेकदा, शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. सूर्यप्रकाश, काही अनुवांशिक घटक आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे होणारे डीएनए नुकसान यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो असं मानलं जातं.

News18
News18
मुंबई : मेलेनोमा या त्वचेच्या कर्करोगाबद्दल अनेक गैरसमज आहेत. सूर्यप्रकाश अजिबात पोहोचत नाही अशा शरीराच्या भागांमधे हा कर्करोग होऊ शकतो. मेलेनोमा या कर्करोगाची लक्षणं लगेच अधिक आढळत नाहीत.
त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्वत:ची नियमित तपासणी. कारण अनेकदा, शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. सूर्यप्रकाश, काही अनुवांशिक घटक आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे होणारे डीएनए नुकसान यामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो असं मानलं जातं.
त्वचेचा कर्करोग काही वेळा कानाच्या बाहेरील भागात सुरू होऊ शकतो. सुरुवातीला कोरडी, खवलेयुक्त त्वचा किंवा हळूहळू वाढणारी पांढरी गाठ अशी लक्षणं दिसतात. ही लक्षणं सहसा वेदनारहित असतात, ज्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं.
advertisement
उपचार केले नाही तर ते आतील कान आणि आजूबाजूच्या हाडांमधे कर्करोग पसरू शकतो. नखाखाली होणाऱ्या कर्करोगाला सबंग्युअल मेलेनोमा म्हणतात. ही लक्षणं नखाखाली किंवा पायाच्या नखाखाली गडद किंवा काळ्या डागाच्या रूपात दिसू शकतात.
पुरुषांमधे, जननेंद्रियाच्या त्वचेवर संशयास्पद जखमा देखील त्वचेच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतात, म्हणून या भागांची तपासणी करणं देखील महत्वाचं आहे.
advertisement
डोळ्यातील मेलेनोमा डोळ्याच्या पांढऱ्या भागात किंवा डोळ्याच्या बाहुलीभोवती गडद ठिपक्याच्या स्वरूपात दिसू शकतो. त्याच वेळी, पापण्यांवर तयार होणाऱ्या लहान, कठीण गाठी वेगानं वाढू शकतात.
जिभेवर आणि तोंडाच्या आत देखील कर्करोग पसरु शकतो, विशेषतः धूम्रपान करणाऱ्या किंवा जास्त मद्यपान करणाऱ्यांमधे हे प्रमाण जास्त असतं. गाठी, न बरे होणारे व्रण, मुंग्या येणं, बधीर होणं किंवा कडक पांढरे डाग ही धोक्याची लक्षणं असू शकतात.
advertisement
त्वचेचा कर्करोग पायांच्या तळव्यावर आणि हातांच्या तळव्यावर देखील होऊ शकतो. ज्यांची त्वचा काळी आहे आणि ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश येत नाही अशा लोकांमध्ये हे अधिक सामान्य आहे. कर्करोग टाळूवर देखील लपून राहू शकतो, विशेषतः केस पातळ झालेले किंवा टक्कल पडलेल्यांमधे ही लक्षणं दिसू शकतात.
advertisement
ओठांच्या त्वचेचा कर्करोग पुरुषांमध्ये अधिक सामान्य आहे आणि तो धूम्रपान, मद्यपान आणि एचपीव्ही संसर्गाशी जोडला गेला आहे. शिवाय, टॅटू केलेले भाग तीळ किंवा चट्टे लपवू शकतात, ज्यामुळे बदल शोधणं कठीण होतं.
कुटुंबात त्वचेच्या कर्करोगाचा इतिहास असेल, त्वचा खूप गोरी असेल, जास्त तीळ असतील किंवा जास्त काळ बाहेर राहावे लागत असेल तर अतिरिक्त काळजी घेणं आवश्यक आहे. दर तीन महिन्यांनी स्वतःची तपासणी करा, आरशाचा वापर करुन लक्षणं दिसतायत का ते पाहावं आणि प्रियजनांना तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगा. त्वचेचा कर्करोग जितक्या लवकर आढळेल तितके उपचार सोपे आणि प्रभावी होतील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Cancer : त्वचेचा कर्करोग का होतो ? लक्षणं ओळखा, कारणं समजून घ्या, वेळीच व्हा सावध
Next Article
advertisement
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली; सोने आणणाऱ्यांना बसला मोठा झटका
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली
  • दुबईत सोनं खरेदी करणं आता अशक्य

  • सामान्यांना मोठा झटका

  • सर्व गणितं कोलमडली

View All
advertisement