Anti Aging : त्वचेवरचा ग्लो कायम ठेवण्यासाठी सोपे उपाय, पपई, दूध, अंड्यामुळे त्वचा दिसेल तरुण
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी, सोपे आणि नैसर्गिक उपाय वापरुन पाहता येतील. सनस्क्रीन लावणं, केशर आणि दूध लावणं, पपई, अंड हे पर्याय लक्षात ठेवा.
मुंबई : वयानुसार त्वचेत फरक दिसून येतात. काहींची त्वचा सैल होते, काहींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. बारीक रेषा दिसायला सुरुवात होते. वयानुसार फरक जाणवणं सामान्य आहे पण काहींना या समस्या लहान वयातच दिसायला लागतात.
त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी, सोपे आणि नैसर्गिक उपाय वापरुन पाहता येतील. सनस्क्रीन लावणं, केशर आणि दूध लावणं, पपई, अंड हे पर्याय लक्षात ठेवा.
वृद्धत्वाच्या खुणा कमी करण्यासाठी सनस्क्रीन हा सर्वोत्तम मार्ग आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं संरक्षण होणं आवश्यक आहे. बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणं अत्यंत महत्वाचं आहे.
advertisement
केशर आणि दूध: केशरात असलेल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. म्हणून, फक्त दोन चमचे दुधात थोडं केशर घालून कापसाच्या मदतीनं चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटं तसंच ठेवा आणि नंतर चेहरा धुवा.
पपई: पपईतल्या पपेन या एंजाइममुळे बारीक रेषा कमी होऊ शकतात आणि त्वचा घट्ट राहते. पपई चेहऱ्यावर लावण्यासाठी, एक पिकलेली पपई घ्या, ती कुस्करा आणि चेहऱ्यावर लावा.
advertisement
पंधरा ते वीस मिनिटांनी धुवा. पपई नियमितपणे चेहऱ्यावर लावली तर त्वचा स्वच्छ आणि घट्ट राहू शकते.
अंड्याचा पांढरा भाग: अंड्याच्या पांढऱ्या भागामुळे त्वचा घट्ट राहते आणि चेहऱ्यावरची छिद्र आकुंचन करण्यास मदत होते. चेहऱ्यावर लावण्यासाठी, अंड्याचा पांढरा भाग काढा आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. ही पेस्ट ब्रशनं चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर थंड पाण्यानं धुवा. त्वचेला कुठलीही एलर्जी येत असेल तर त्वचातज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 6:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Anti Aging : त्वचेवरचा ग्लो कायम ठेवण्यासाठी सोपे उपाय, पपई, दूध, अंड्यामुळे त्वचा दिसेल तरुण









