advertisement

Drooling : झोपेत लाळ येणं थांबवण्यासाठी काय करायचं ? लाळ कशामुळे गळते ? औषधांची गरज कधी लागते ?

Last Updated:

झोपेतून उठताना लाळ आलेली असणं याकडे किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष केलं जातं. पण यामागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. फक्त मुलांमधेच नाही तर प्रौढांमधेही लाळ गळण्याची समस्या दिसून येते.

News18
News18
मुंबई : सकाळी झोपेतून उठताना अनेकांची उशी लाळेमुळे ओली झालेली असते. तोंडात लाळ साठलेली असते. झोपेतून उठताना लाळ आलेली असणं याकडे किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष केलं जातं. पण यामागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. फक्त मुलांमधेच नाही तर प्रौढांमधेही लाळ गळण्याची समस्या दिसून येते.
झोपेत लाळ येणं यामागे अनेकदा शरीरात काहीतरी घडत असल्याचं लक्षण असू शकतं. वैद्यकीय भाषेत, याला drooling म्हणतात आणि जेव्हा लाळ येण्याचं प्रमाण जास्त असतं तेव्हा त्याला सायलोरिया किंवा हायपरसॅलिव्हेशन म्हणतात.
बहुतेक प्रकरणांमधे ही समस्या गंभीर नसते, पण कधीकधी ही समस्या खूप मोठी होऊ शकते. झोपण्याची स्थिती ही सर्वात मोठी समस्या आहे. जे लोक कुशीवर किंवा पोटावर झोपतात त्यांच्यामधे लाळ गळण्याचं प्रमाण जास्त असतं. गुरुत्वाकर्षणामुळे तोंडात राहण्याऐवजी लाळ बाहेर पडते. तोंडानं श्वास घेणाऱ्यांमधे हे प्रमाण जास्त जाणवतं.
advertisement
सायनस समस्या - सर्दी, फ्लू, ऍलर्जी किंवा सायनस संसर्गामुळे जेव्हा नाक बंद होतं तेव्हा आपल्याला तोंडातून श्वास घ्यावा लागतो, ज्यामुळे आपलं तोंड उघडं राहतं आणि लाळ बाहेर पडू शकते. सायनसच्या समस्या असलेल्यांमधे ही समस्या सामान्य आहे.
औषधांचे दुष्परिणाम - काही औषधांमुळेही लाळ निर्माण होऊ शकते. अँटीसायकोटिक औषधं, अल्झायमर औषधं आणि काही अँटीबायोटिक्समुळे लाळ गळू शकते.
advertisement
स्लीप एपनियाचा धोका - लाळ येणं, जोरात घोरणं, सकाळी घसा कोरडा पडणं आणि रात्री श्वास लागल्यामुळे झोपेतून उठणं हे स्लीप एपनियाची लक्षणं असू शकतात. झोपेदरम्यान श्वास घेण्यास वारंवार थांबणं यामुळे होणारा हा गंभीर निद्रा विकार आहे.
advertisement
हे टाळण्यासाठी काही उपाय करता येतील. झोपण्याची स्थिती बदला. तोंड आणि दात नियमितपणे स्वच्छ ठेवा.
मँडिब्युलर उपकरण वापरा. CPAP मशीन वापरा. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लिंबाचा तुकडा चोखणं आणि भरपूर पाणी पिणं यासारखे घरगुती उपाय करून पाहता येतील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Drooling : झोपेत लाळ येणं थांबवण्यासाठी काय करायचं ? लाळ कशामुळे गळते ? औषधांची गरज कधी लागते ?
Next Article
advertisement
दिग्गज कंपनीचा महाभयंकर निर्णय; 16,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, आतापर्यंत 30 हजार कुटुंबांवर आभाळ कोसळलं
दिग्गज कंपनीचा महाभयंकर निर्णय; 16,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
  • 16 हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात नारळ

  • एका ई-मेलने उध्वस्त झालं घर…

  • जगभरातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

View All
advertisement