advertisement

सोयाबीन आणि तुरीच्या दरात घसरण, कांद्याची कशी राहीली स्थिती? Video

Last Updated:

कपाशी, सोयाबीन आणि तुरीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली असताना, कांद्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे. पाहुयात, प्रमुख शेतमालाची आवक किती? भाव किती मिळाला.

+
Maharashtra

Maharashtra Krushi Market updates 

अमरावती : 28 जानेवारी बुधवार रोजी राज्यातील कृषी बाजार समित्यांमध्ये विविध पिकांच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले. कपाशी, सोयाबीन आणि तुरीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली असताना, कांद्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे. पाहुयात, प्रमुख शेतमालाची आवक किती? भाव किती मिळाला.
कपाशीचे दर दबावात
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यभरात कपाशीची एकूण 11 हजार 238 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये नागपूर बाजारात सर्वाधिक सुमारे 3 हजार क्विंटल कपाशीची आवक नोंदवली गेली. येथे कपाशीला किमान 7 हजार 900 ते कमाल 7 हजार 950 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर परभणी बाजारात कपाशीला प्रतिक्विंटल 8 हजार 325 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. मात्र, मंगळवारीच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
कांद्याच्या दरात वाढ
राज्यात आज कांद्याची एकूण 2 लाख 83 हजार 690 क्विंटल इतकी आवक झाली. नाशिक बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक 1 लाख 11 हजार 211 क्विंटल आवक नोंदवण्यात आली. या बाजारात कांद्याला किमान 478 ते कमाल 1 हजार 447 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर नागपूर बाजारात लोकल कांद्याला प्रतिक्विंटल 2 हजार 560 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाल्याचे दिसून आले. मंगळवारीच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.
advertisement
सोयाबीनचे भाव घसरले
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये सोयाबीनची एकूण आवक 18 हजार 435 क्विंटल इतकी झाली. अकोला बाजारात 4 हजार 802 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, येथे किमान 5 हजार 335 ते कमाल 5 हजार 675 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. वाशिम बाजारात पिवळ्या सोयाबीनला 6 हजार 050 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला. मात्र, मंगळवारीच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे.
advertisement
तुरीच्या दरात नरमाई
राज्यात आज तुरीची एकूण 15 हजार 340 क्विंटल इतकी आवक झाली. अमरावती बाजारात सर्वाधिक 3 हजार 531 क्विंटल तुरीची आवक झाली. येथे तुरीला किमान 8 हजार ते कमाल 8 हजार 750 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर लातूर बाजारात तुरीला 9 हजार 130 रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याचे दिसून आले. मात्र, मंगळवारीच्या तुलनेत आज तुरीच्या दरातही घट झाल्याचे चित्र आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीन आणि तुरीच्या दरात घसरण, कांद्याची कशी राहीली स्थिती? Video
Next Article
advertisement
दिग्गज कंपनीचा महाभयंकर निर्णय; 16,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, आतापर्यंत 30 हजार कुटुंबांवर आभाळ कोसळलं
दिग्गज कंपनीचा महाभयंकर निर्णय; 16,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
  • 16 हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात नारळ

  • एका ई-मेलने उध्वस्त झालं घर…

  • जगभरातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

View All
advertisement