advertisement

लाडक्या दादासाठी जनसागर लोटला, पार्थिव आणल्यानंतर काळीज पिळवटून टाकणारा कार्यकर्त्यांचा आक्रोश

Last Updated:

अजित पवारांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात मोठा जनसागर उसळला होता.

News18
News18
पुणे : अवघ्या महाराष्ट्रावर जणू दुखाचा डोंगर कोसळला... उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान दुर्घटनेत निधन झालं.. सकाळी ते मुंबईहून बारामतीला जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी खासगी विमानाने निघाले होते.. पण बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याआधीच विमानाचा अपघात झाला. अजित पवारांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात मोठा जनसागर उसळला होता. आपल्या लाडक्या नेत्याला अंतीम दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. या वेळी धक्काबुक्की झाल्याचे समोर आले.
अजित पवार यांच्या अकाली जाण्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. वेगवान कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांना विमानाच्या वेगवान प्रवासानंच बळी घेतला. अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आणल्यानंतर उपस्थितांनी मोठा आक्रोश केला. दादांना पाहण्यासाठी धक्काबुकी झाली. यावेळी पोलिसांनी शांत राहण्याचे आवाहन केले. सगळ्यांना दादांचे दर्शन मिळेल कोणीही गर्दी करू नका, असे आवाहन करण्यात आले. मैदानातील शेवटच्या मणसाला देखील अजित पवारांचे दर्शन मिळेल, असे म्हणत नागरिकांना आवाहन केले. बारामतीकर ऐकत नसल्याने अखेर अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी शांत होण्याचे आवाहन केले आहे.
advertisement

बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमानाचा अपघात कसा झाला?

अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर नेता आहे. सगळी कामं वेळेत करण्यावर भर देणारा, वेळेला महत्व देणाऱ्या या नेत्यांची बुधवारची वेळ मात्र चुकली.. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रचारासाठी बारामतीत सभेसाठी निघालेल्या अजित पवारांचं विमान बारामतीत लँड होतानाच क्रॅश झालं. बिझनेस क्लासचा बादशाह अशी ओळख असलेल्या व्हीएसआर' या ऑपरेटरचे 'लिअरजेट 45' श्रेणीतील हे विमान.. पण, याच विमानानं अजित पवारांचा घात केला.. मुंबईहून सकाळी बारामतीच्या दिशेनं निघालेल्या विमानात सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळं विमानाचा भीषण अपघात झाला आणि यात विमानातील अजित पवारांसह पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला.
advertisement

अशी घडली विमान दुर्घटना?
  • सकाळी पावणे नऊचा वेळ असल्यानं बारामतीत दाट धुक्यामुळे दृश्यमानता खूप कमी होती
  • बारामतीच्या धावपट्टीवर आयएलएस प्रणाली उपलब्ध नाही
  • त्यामुळं पायलटला व्हिज्युअल आणि मॅन्युअल लँडिंग करावं लागलं
  • पण, पहिल्यांदा धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमानानं हवेत वळण घेतलं
  • त्यामुळं पायलटचा पहिल्या लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला
  • पहिल्यांदा अपयश आल्यानं पायलटकडून विमान लँडिंगचा दुसरा प्रयत्न झाला
  • पण, धुक्यामुळे विमान आणि धावपट्टीचं अचूक अलाईन्मेंट करणं कठीण जात होतं.
  • त्यामुळं या आपात्कालीन स्थितीत पायलटकडून 'MAYDAY' संदेश देण्यात आला
  • हे सगळं सुरू असतानाच जमिनीपासून 100 फूट उंचीवर विमानाचा कंट्रोल सुटला
  • बारामतीची धावपट्टी ही टेबल टॉप आहे असल्यानं
  • लँडिंगच्या प्रयत्नात विमान धावपट्टीच्या टोकावर कोसळलं
  • विमान जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला,त्यानंतर 4-5 स्फोट झाले
  • स्फोटानंतर विमान आगीत जळून खाक झाली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली
  • आगीची तीव्रता जास्त असल्यानं बचावकार्य अशक्य बनलं.
advertisement

घड्याळावरुन  ओळख पटली

बारामतीच्या गोजुबावीतील डोंगरावर सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी हे विमान कोसळलं. हा अपघात इतका भीषण होता की विमानातील अजित पवारांसह असलेल्या पाचही जण होरळून मृत्यूमुखी पडले..
विमानाच्या स्फोटामुळे विमानं पूर्णपणे जळून खाक झालं होतं.. अशा परिस्थिती मृतदेहांची ओळख पटवणंही अवघड बनलेलं. पण, अजित पवारांच्या हातावरची घड्याळावरुन त्यांची ओळख पटल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
advertisement

अकाली एक्झिट अवघ्या महाराष्ट्राला चटका लावणारी

अपघात झालेलं हे 'लिअरजेट 45' विमान प्रामुख्यानं अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी बनवण्यात आलं. हे त्याच्या वर्गातील सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे. हे विमान ताशी सुमारे 860 किमी वेगाने उडू शकतं. मुंबई ते बारामती हे अंतर हे विमान अवघ्या 20 ते 25 मिनिटांत कापतं.. पण, वेगवान अजित पवारांच्या या वेगवान विमानानं बळी घेतला. वेळेचे पक्के असलेल्या अजित पवारांचा या अपघातानं वेळ चुकवला. दादांची ही अकाली एक्झिट अवघ्या महाराष्ट्राला चटका लावून गेली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लाडक्या दादासाठी जनसागर लोटला, पार्थिव आणल्यानंतर काळीज पिळवटून टाकणारा कार्यकर्त्यांचा आक्रोश
Next Article
advertisement
'मी त्यांना सकाळी 6.30 वाजता कामावर जाताना पाहिलं होतं…'; अजितदादांचे PSO विदीप जाधव यांच्या मृत्यूने कळवा परिसर सुन्न
मी त्यांना सकाळी कामावर जाताना पाहिलं…; विदीप जाधव यांच्या मृत्यूने शेजारी सुन्न
  • अजित पवारांसोबत सावलीसारखे राहणारे विदीप जाधव

  • नेहमीप्रमाणे दादा कामावर गेले, पण परतलेच नाही

  • विदीप जाधव यांच्या निधनाने कुटुंब पोरकं

View All
advertisement