Uric Acid : किडनी खराब होण्यामागे युरिक अॅसिड कारणीभूत? शंका असल्यास 5 महत्त्वाच्या तपासण्या करा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सुरुवातीला साधे वाटणारे सांधेदुखीचे आजार भविष्यात किडनी निकामी होण्यापर्यंत मजल मारू शकतात. पण नेमकी ही समस्या काय आहे आणि ती कशी ओळखायची? चला जाणून घेऊया.
advertisement
यूरिक ॲसिड म्हणजे नक्की काय?सोप्या भाषेत सांगायचे तर, यूरिक ॲसिड हा शरीरातील एक 'टाकाऊ पदार्थ' (Waste Product) आहे. जेव्हा आपण खाल्लेल्या अन्नातील 'प्युरीन' (Purine) नावाच्या घटकाचे पचन होते, तेव्हा यूरिक ॲसिड तयार होते. हे प्युरीन प्रामुख्याने मांस, सीफूड आणि अल्कोहोलमध्ये मोठ्या प्रमाणात असते.
advertisement
advertisement
advertisement
किडनी आणि सांध्यांवर होणारा परिणामजेव्हा रक्तातील यूरिक ॲसिड वाढते, तेव्हा त्याचे बारीक खड्यांसारखे 'क्रिस्टल्स' तयार होतात. हे क्रिस्टल्स सांध्यांमध्ये अडकल्यास प्रचंड वेदना आणि सूज येते, ज्याला आपण 'गाउट' (Gout) किंवा वात म्हणतो. एवढेच नाही, तर हे क्रिस्टल्स किडनीमध्ये जमा झाले की किडनी स्टोन (खडे) तयार होतात किंवा किडनीची कार्यक्षमता कमी होते.
advertisement
वेळेवर निदान कसे करावे?डॉक्टर प्रामुख्याने 5 प्रकारच्या चाचण्यांद्वारे याचे निदान करतात:1. सीरम यूरिक ॲसिड टेस्ट: रक्तातील पातळी मोजण्यासाठी.2. इमेजिंग टेस्ट: किडनीतील खडे पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड किंवा सीटी स्कॅन.3. यूरिन टेस्ट: २४ तासांत लघवीवाटे किती ॲसिड बाहेर पडते हे पाहण्यासाठी.4. किडनी फंक्शन टेस्ट (KFT): क्रिएटिनिन आणि BUN तपासणी.5. जॉइंट फ्लुइड टेस्ट: सांध्यातील द्रव काढून त्यात क्रिस्टल्स आहेत का हे तपासण्यासाठी.
advertisement
बचावासाठी काय करावे?यूरिक ॲसिड नियंत्रित ठेवणे आपल्याच हातात आहे. त्यासाठी हे नियम पाळा.पाणी भरपूर प्या: दिवसातून किमान 3-4 लिटर पाणी प्या, जेणेकरून ॲसिड फ्लश होईल.आहारावर नियंत्रण: रेड मीट, सीफूड आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा.वजन संतुलित ठेवा: लठ्ठपणामुळे यूरिक ॲसिड वाढण्याचा धोका जास्त असतो.नियमित तपासणी: मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी सतत देखरेख ठेवावी.








