Ajit Pawar Death : अबाल वृद्धांपासून सगळेच भावूक, दादांच्या निधनाने मंत्र्यांची नातंही रडली; लाडक्या बहिणींच्या अश्रूंचा बांध फुटला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मधील लाडक्या बहिणींना अश्रू अनावर झाले होते. आमचे दादा आमचे सर्वस्व होते.गरिबांचे नेते होते. दादा गेल्यामुळे आज आमची बारामती उघडी पडली.
advertisement
advertisement
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मधील लाडक्या बहिणींना अश्रू अनावर झाले होते. आमचे दादा आमचे सर्वस्व होते.गरिबांचे नेते होते. दादा गेल्यामुळे आज आमची बारामती उघडी पडली. आता दादाच राहिले नाही त्यामुळे काही बोलू शकत नाही.लाडक्या बहिणींना त्यांनी खूप सपोर्ट केला, गरिबांचे ते दादा होते,अशा शब्दात एका लाडक्या बहिणीनने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव बारामती रुग्णालयातुन विद्या प्रतिष्ठान मध्ये हलवण्यात आले आहे. यावेळी रुग्णवाहिकेमध्ये पार्थ पवार पुढे बसले असून कुटुंबातील सदस्य सोबत आहे. अजित पवारांचे पार्थिव घेऊन जाताना कार्यकर्त्यांचा मोठा आक्रोश.'अजित दादा अमर रहे', 'दादांचे दादा अजित दादा' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
advertisement
advertisement
अजित पवार यांच्या निधनानंतर नगर जिल्हाध्यक्षालाही अश्रू अनावर झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेचा, गोरगरिबांचा कैवारी गेला. माझे वडील गेले असले तरी चालले असते.असा माणूस होणे नाही हो, काही प्रतिक्रिया नाही. कालच मला मुंबईला बोलावलं होत,आम्ही अर्धा तास चर्चा केली, नगर जिल्ह्याची,तालुक्याची रचना आणि विकासावर आमची चर्चा झाली,असे नगर नगर जिल्हाध्यक्षांनी यावेळी सांगितलं.
advertisement
शारदा प्रांगणात अजित पवार यांच्या सभा पार पाडायच्या. या प्रांगणा बाहेरील एका वृद्ध कार्यकर्त्याने अजित पवार यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. दादा जाणं म्हणजे बारामतीवर शोककळा आहे.जसे महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि हिंदू धर्म वाढवला तसेच दादा गेले म्हणजे बारामतीचा शो गेला.बारामतीला वाईट दिवस आले. दादा जाणे हे अत्यंत दु:खद आहे.दादा जायला नको होते, पण ते गेले अशा शब्दात एका वृद्ध कार्यकर्त्यांने दु:ख व्यक्त केले.
advertisement
अजित पवार यांच्या निधनाची माहिती कळताच मंत्री हसन मुश्रीफ यांची नात ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळालं.याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हसन मुश्रीफ यांची लहानगी नात आयेझा मुश्रीफ हिला या निधनाची माहिती मिळताच तीही भावूक झाली होती.अनेकदा सभेच्या वेळी तिची अजित पवार यांच्यासोबत भेट झाली होती.पण आज अचानक मृत्यूची बातमी कळताच तिला देखील अश्रू अनावर झाले.







