advertisement

Plane Crash : भारतातील विमान अपघातात बचावलेली एकमेव व्यक्ती! अहमदाबाद दुर्घटनेतील जखमी विश्वकुमार रमेश आता कुठे आहे?

Last Updated:
Plane Crash Survival : अजित पवारांसह 5 जणांचा विमान अपघाताता मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बरोबर 6 महिन्यांपूर्वी अहमदाबादमध्येही प्लेन क्रॅश झालं होतं. त्यात 241 जणांचा मृत्यू झाला होता. पण एक व्यक्ती चमत्कारित्या बचावली होती.
1/7
12 जून 2025 ची घटना.... अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच लंडनला जाणारे बोईंग 787 विमान कोसळून आगीचा गोळा बनलं. धुराच्या लोटात आणि जळत्या ढिगाऱ्यात, एक माणूस स्वतःच्या पायांवर चालत बाहेर आला. तो म्हणजे विश्वासकुमार रमेश होता. मूळचा भारतातील, गुजरातचा. पण ब्रिटनमध्ये राहणारा.
12 जून 2025 ची घटना.... अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच लंडनला जाणारे बोईंग 787 विमान कोसळून आगीचा गोळा बनलं. धुराच्या लोटात आणि जळत्या ढिगाऱ्यात, एक माणूस स्वतःच्या पायांवर चालत बाहेर आला. तो म्हणजे विश्वासकुमार रमेश होता. मूळचा भारतातील, गुजरातचा. पण ब्रिटनमध्ये राहणारा.
advertisement
2/7
39 वर्षांचा विश्वकुमार अहमदाबादमध्ये घडलेल्या बड्या विमान दुर्घनेटतून बचावलेली एकमेव व्यक्ती.विश्वकुमारचा भाऊही या विमानात होता, त्याचा मृत्यू झाला. विश्वकुमार 11A सीटवर जी एमर्जन्सी एक्झिटजवळील सीट आहे तिथं बसला होता. त्यामुळेच त्याला आपला जीव वाचण्यात मदत झाली.
39 वर्षांचा विश्वकुमार अहमदाबादमध्ये घडलेल्या बड्या विमान दुर्घनेटतून बचावलेली एकमेव व्यक्ती.विश्वकुमारचा भाऊही या विमानात होता, त्याचा मृत्यू झाला. विश्वकुमार 11A सीटवर जी एमर्जन्सी एक्झिटजवळील सीट आहे तिथं बसला होता. त्यामुळेच त्याला आपला जीव वाचण्यात मदत झाली.
advertisement
3/7
बीबीसीशी बोलताना विश्वासकुमार म्हणाला होता,
बीबीसीशी बोलताना विश्वासकुमार म्हणाला होता, "मी एकटाच जिवंत आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. जखमी विश्वकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली होती.
advertisement
4/7
त्याने स्वतःला सर्वात भाग्यवान आणि सर्वात दुर्दैवी असं म्हटलं.  बीबीसीशी बोलताना रमेश म्हणाले,
त्याने स्वतःला सर्वात भाग्यवान आणि सर्वात दुर्दैवी असं म्हटलं.  बीबीसीशी बोलताना रमेश म्हणाले, "मी वाचलो, पण मी सर्वस्व गमावलं." या अपघातामुळे त्याच्या पायांना, खांद्यांना आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. आता तो काम करू शकत नाही किंवा गाडी चालवू शकत नाही.
advertisement
5/7
आपलं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही असंही तो त्यावेळी म्हणाला होता.
आपलं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही असंही तो त्यावेळी म्हणाला होता. "मी कोणाशीही बोलत नाही. ना माझी पत्नी, ना माझा मुलगा. मी फक्त माझ्या खोलीत एकटाच बसतो.जेव्हा मी चालतो तेव्हा मला नीट चालू शकत नाही. माझी पत्नी मला आधार देते,", असं त्याने तेव्हा सांगितलं होतं.
advertisement
6/7
विश्वकुमार म्हणाला,
विश्वकुमार म्हणाला, "दररोज रात्री जेव्हा मी डोळे बंद करतो तेव्हा मला तीच आग, तीच किंकाळी ऐकू येते. मी जिवंत आहे, पण तो दिवस माझ्या प्रत्येक श्वासात जळतो."
advertisement
7/7
विश्वासकुमारला पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) असल्याचं निदान झालं होतं. त्याच्या सल्लागारांच्या मते, तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निराश होता
विश्वासकुमारला पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) असल्याचं निदान झालं होतं. त्याच्या सल्लागारांच्या मते, तो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निराश होता" दरम्यान विश्वकुमार आता काय करतो, आता त्याची प्रकृती कशी आहे, याबाबत आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याबाबत कोणती माहिती मिळालेली नाही. (सर्व फोटो : फाइल, सोशल मीडिया)
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement