सोलापूर - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांची झपाटून काम करण्याची शैली आणि दिलेला शब्द पाळणारा नेता हीच ओळख होती. सोलापूर जिल्ह्यातील पापरीच्या जिल्हा परिषद आदर्श शाळेला अजितदादांनी भेट दिली होती. तेव्हा शाळेला अडीच एकर जमीन देण्याचा दिलेला शब्द त्यांनी शब्दशः पाळला होता. आता याच जागेवर शाळेची देखणी इमारत उभी राहात असून या इमारतीचं उद्घाटन अजितदादांच्या हस्तेच करण्याचा मानस होता. त्यासाठी पुन्हा शाळेत येण्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण आता अजितदादा आणि गावकऱ्यांचं हे स्वप्न अधुरंच राहणार आहे.



