Ajit Pawar Death: 'काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत ह्यापेक्षा…', अजित पवारांच्या निधनाने सुन्न झाली मराठी सिनेसृष्टी
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ajit Pawar death: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे व्यक्तिमत्व केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी आणि कलाकारांशी त्यांचे अत्यंत जवळचे आणि सलोख्याचे संबंध होते.
आज २८ जानेवारी, २०२६ हा दिवस महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनाला चटका लावून जाणारा दिवस ठरला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती येथील नियोजित प्रचारासाठी जात असताना त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह विमानातील इतर लोकांनीही जीव गमावला असल्याची माहिती समोर आली असून, संपूर्ण राज्य सध्या सुन्न झाले आहे.
advertisement
अजित दादांचे व्यक्तिमत्व केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी आणि कलाकारांशी त्यांचे अत्यंत जवळचे आणि सलोख्याचे संबंध होते. कलाकारांच्या समस्या असोत किंवा मराठी सिनेमाला प्रोत्साहन देणे, दादा नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभे राहत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मराठी मनोरंजन विश्वातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
advertisement
advertisement
खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यासाठी अत्यंत भावुक पोस्ट लिहिली आहे, "महाराष्ट्राच्या विकासपुरुषास भावपूर्ण श्रद्धांजली..! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, संपूर्ण राज्याचे लाडके आणि हक्काचे दादा मा. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी अतिशय क्लेशदायक आहे. खरतर अजूनही विश्वास बसत नाही की अजित दादा आता आपल्यात नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राने आज एक उत्तम प्रशासक, शिस्तशील नेतृत्व आणि जनतेसाठी भल्या पहाटेपासूनच काम करणारा हक्काचा माणूस गमावला आहे. दादा तुमचे हे अकाली जाणे सर्वसामान्य जनतेलाही बिलकुल रुचले नाही. आज फक्त बारामतीकरच नव्हे तर राज्यातील प्रत्येक सर्वसामान्याच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि सोबतच पोरकेपणाची भावना आहे. ज्या माणसाने आयुष्याचा प्रत्येक क्षण महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि फाईल्सचा निपटारा करण्यासाठी वेचला, तो आवाज आज शांत झाला, यावर विश्वासच बसत नाही. दादांचा स्वभाव अनेकांना कडक वाटला असेल, पण त्या कडकपणामागे राज्याच्या हिताची कळकळ आणि कार्यकर्त्यांबद्दलचा जिव्हाळा होता. राजकारणात शब्द बदलणारे खूप पाहिले, पण “दादांनी शब्द दिला म्हणजे काम होणारच” हा जनतेचा विश्वास आता कायमचा स्मृती बनला आहे. मंत्रालयातील त्या रिकाम्या दालनस देखील अजित पवार यांच्यासारख्या कार्यशील व कर्तृत्व्वान नेतृत्वाची कायम उणीव भासेल. दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील..!"
advertisement
अभिनेता स्वप्नील जोशीने लिहिलंय, "आदरणीय अजित दादा, भावपूर्ण श्रद्धांजली! महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचं स्थान वेगळं आणि उठून दिसणारं होतं…कायम राहील. तुमचं साधेपण, काम करण्याची तुमची तळमळ, मनाला भिडणारी होती. सामान्य माणसाशी त्त्यांना आपलं करून संवाद साधण्याचं तुमचं कसब खरोखरच दुर्मिळ होतं. तुमची ऊर्जा आणि तुमचं व्यक्तिमत्त्व कायम प्रेरणा देत राहील. ॐ शांति !"
advertisement
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने लिहिलंय, "माझे अत्यंत लाडके नेते, महाराष्ट्राचे लोकनेते आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री, अजितदादा यांच्या विमान अपघातामुळे झालेल्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. हे महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनावर घट्ट पकड असलेला ॲडमिनीस्ट्रेटर गेला! लोकांचं काम करणारा माणूस गेला… अलविदा दादा! भावपूर्ण श्रद्धांजली…"
advertisement
advertisement
advertisement
ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव यांनीही अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत लिहिलं आहे, "देव कुटुंबासाठी हा अत्यंत कठीण आणि मन हेलावून टाकणारा क्षण आहे. अजित दादा आता आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. ते केवळ एक उत्तम व्यक्तिमत्व, राजकारणी आणि खंबीर प्रशासक नव्हते, तर आमच्या कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेही होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून काढता येणार नाही. संपूर्ण पवार कुटुंब आणि माझा जवळचा मित्र पार्थ पवार यांच्या दु:खात मी सहभागी असून, त्यांना या मोठ्या संकटातून सावरण्यासाठी ईश्वर शक्ती देवो, हीच प्रार्थना. ओम शांती!"
advertisement
advertisement
अभिनेता संकर्षण कारंडेने अत्यंत भावुक पोस्ट शेअर करत अजित पवार यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत, "मा. अजित पवार सरांचं जाणं फार दूर्दैवी … काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत ह्यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली की आधार वाटतो… त्यातले अजीतदादा पवार हे तसे आधार वाटायचे… आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटतं आहे… खूप त्रास होतोय… !!! गंभीर प्रश्नांवर पण मिश्किल उत्तर देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलायची त्त्यांची शैली कमाल होती… त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले हि भावना मी समजू शकतो …!!! त्यांच्यासह असलेल्या सगळ्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो…!!! अजीत दादा… खूप आठवण येत राहील…"
advertisement
रितेशनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय, "अजित दादांना एका दुर्दैवी अपघातात गमावल्याची बातमी ऐकून धक्का बसला. हृदय हेलावून गेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक गतिमान नेत्यांपैकी ते एक होते. त्यांचं अकाली जाणं ही अतिशय मोठी हानी असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्याशी अनेक वेळा संवाद साधण्याचा मला योग आला होता आणि त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमळ वागणुकीसाठी ते माझ्या कायम आठवणीत राहतील. पवार कुटुंबीय, त्यांचे जवळचे आणि कोट्यवधी समर्थक यांच्याप्रती माझ्या मनापासून संवेदना."
advertisement
advertisement
अभिनेता सुबोध भावेने लिहिलंय, "अजित दादा, महाराष्ट्राच्या राजकारणातील तुम्ही एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होतात. तुम्ही खूप आवडायचा. तुमची काम करण्याची पद्धत, तुमचा हजरजबाबीपणा, तुमची सर्वसामान्य माणसाशी थेट त्याच्या भाषेत संवाद साधण्याची पद्धत. छोट्या छोट्या गोष्टींमधे तुमचं असलेलं लक्ष. तुमची उणीव कायम भासत राहील दादा. तुमच्याशी झालेल्या भेटी कायम स्मरणात राहतील. तुम्ही कायम आठवत रहाल दादा."
advertisement









