advertisement

'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त Automatic Car, किंमत फक्त 4.75 लाखांपासून सुरु

Last Updated:

Cheapest Automatic Car in India: आम्ही तुमच्यासाढी देशातील 5 सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कारची लिस्ट घेऊन आलो आहोत. यामध्ये Maruti Suzuki S-Presso पासून टाटा पंचचाही समावेश आहे. तुमच्यासाठी कोणती बेस्ट ठरु शकते पाहूया...

ऑटोमॅटिक कार
ऑटोमॅटिक कार
Cheapest Automatic Car in India: बदलत्या काळानुसार ऑटोमॅटिक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या ही वेगाने वाढत आहे. विशेषतः ती अशा लोकांना जास्त आवडते, जे शहराच्या गर्दीच्या रस्त्यांवर राहतात, जिथे त्यांना गियर बदलण्याचा त्रास राहत नाही. ट्रॅफिक जाम, लहान गल्ल्या आणि डेली कम्यूटिंगसाठी आता ऑटोमॅटिक कार लग्जरीपेक्षा कमी नाहीत.
तुम्हाला येत्या काळात एक ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची कार खरेदी करायची असेल आणि तुमचं बजेट टाइट असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहोत. आज आपण 5 Most Affordable Automatic Cars ची लिस्ट पाहणार आहोत. या लिस्टमध्ये Maruti Suzuki S-Presso पासून Tata Nexon पर्यंतचे नावं आहेत. चला यांच्या किंमती आणि विशेषतेवर एक नजर टाकूया.
advertisement
Maruti Suzuki S-Presso
या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर मारुती सुझुकी एसप्रेसो आहे. कंपनी याला AGS सह विकते. याची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत फक्त 4.75 लाख रुपयांपासून सुरु होते. ही मिनी-एसयूव्ही स्टाइलची हॅचबॅक आहे. ज्यामध्ये चांगलं ग्राउंड क्लीयरेन्स, कॉम्पॅक्ट साइज आणि 25 kmpl पर्यंतच मायलेज मिळतं.
शहरातील पार्किंग आणि रहदारीसाठी ही एक परिपूर्ण निवड आहे. यात 998cc चं K10C इंजिन आहे जे 68 bhp निर्मिती करते. फीचर्समध्ये टचस्क्रीन, पॉवर विंडो, कीलेस एंट्री आणि मानक सहा एअरबॅग्ज समाविष्ट आहेत. मारुतीचे सर्व्हिस नेटवर्क  रनिंग कॉस्ट कमी ठेवते.
advertisement
Maruti Suzuki Alto
लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर मारुतीची कार आहे. ऑल्टोच्या के10 ला AGS सह फक्त 5.51 लाखांच्या सुरुवातीच्या एक्स शोरुम किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि परवडणाऱ्या कारमधून एक आहे. 24-25 kmpl चं मायलेज, छोटी साइज आणि कमी मेंटेंनेंटमुळे ही कार पहिल्यांदा खरेदी करणाऱ्यांसाठी परफेक्ट ऑप्शन ठरते.
advertisement
मारुती अल्टो K10 मध्ये 998cc इंजिन आहे, जे शहराच्या वेगासाठी पुरेसे आहे. कमी बजेटमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली लोकप्रिय कार शोधणाऱ्या कुटुंबांसाठी हे आदर्श आहे. कंपनी विविध प्रकारच्या सेफ्टी फीचर्ससह स्टँडर्ड म्हणून सहा एअरबॅग्ज देते.
Renault Kwid
रेनॉल्ट क्विड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनी ती एएमटी ऑप्शनसह विकते, ज्याची एक्स-शोरूम किंमत फक्त ₹5.44 लाख आहे. क्विडची मुख्य ताकद म्हणजे तिचा चांगला ग्राउंड क्लिअरन्स (174mm) आहे, जो भारतीय रस्त्यांवरील अडथळे आणि खड्ड्यांसाठी परिपूर्ण आहे. तिचा लूक देखील मारुती कारपेक्षा वेगळा आहे.
advertisement
यामध्ये 1.0L इंजिन आहे. ज्याचं मायलेज जवळपास 22 kmpl च्या जवळ पोहोचलं आहे. हाइयर व्हेरिएंटमध्ये 8-इंच टचस्क्रिन, अँड्रॉइड ऑटो/अॅपल कारप्ले आणि खरेदीदारांना आकर्षित करते. ऑफिस येण्याजाण्यासाठी ही बेस्ट मानली जाऊ शकते.
Maruti Suzuki Celerio
advertisement
मारुती पुन्हा एकदा यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनी कमी किमतीत AGS पर्यायासह सेलेरियो देखील विकते. सेलेरो AGS फक्त ₹5.61 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही प्रशस्त हॅचबॅक चांगली हेडरूम आणि बूट स्पेस देते.
त्याचे इंजिन Alto K10 आणि S-Pressoसारखेच आहे आणि इंधन कार्यक्षमता सुमारे 26 kmplपर्यंत पोहोचते. स्टँडर्ड 6 एअरबॅग S-Presso ला सेगमेंटमध्ये सर्वात बेस्ट कारमधून एक बनवते. रिफाइंड इंजिन आणि स्मूद एजीएस गिअरबॉक्स फॅमिली यूजसाठी बेस्ट आहेत.
advertisement
Tata Punch
पाचव्या नंबरवर  Tata punchचा समावेश आहे. याचं सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक व्हेरिएंट (Pure Plus AMT) फक्त 7.55 लाख रुपयांची सुरुवाती एक्स शोरुम किंमतवर उपलब्ध आहे. 2026 च्या फेसलिफ्ट मॉडलमध्ये हे मायक्रो-एसयूव्ही आपली 5-स्टार भारत NCAP सेफ्टी रेटिंग (एडल्ट प्रोटेक्शन 30.58/32 आणि चाइल्ड 45/49) सह सर्वात सुरक्षित पर्याय आहे.
यात स्टँडर्ड म्हणून सहा एअरबॅग्ज, ESP, हिल होल्ड असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, TPMS आणि मजबूत बॉडी स्ट्रक्चर आहे. त्याचे 1199cc नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 87 bhp निर्माण करते आणि सुमारे 18-20 किमी प्रति लिटर इंधन कार्यक्षमता देते. त्याचा 193mmग्राउंड क्लीयरन्स, 366 लिटर बूट स्पेस आणि एसयूव्हीसारखी स्टाइलिंग तिला इतर हॅचबॅकपेक्षा वेगळे करते. कंपनीने तिच्या उच्च व्हेरिएंटमध्ये 360-डिग्री कॅमेरा आणि सनरूफ देखील समाविष्ट आहे.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त Automatic Car, किंमत फक्त 4.75 लाखांपासून सुरु
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement