advertisement

होळीपूर्वीचे 8 दिवस अत्यंत धोक्याचे! 'होलाष्टकात' चुकूनही करू नका 'ही' कामे, अन्यथा भोगावे लागतील परिणाम

Last Updated:
हिंदू धर्मात सण-उत्सवांना जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व त्यापूर्वीच्या विशेष कालावधीलाही दिले जाते. होळीच्या 8 दिवस आधीच्या काळाला 'होलाष्टक' असे म्हणतात. यंदा मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 पासून होलाष्टक सुरू होत असून ते 3 मार्च 2026 पर्यंत असेल.
1/7
हिंदू धर्मात सण-उत्सवांना जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व त्यापूर्वीच्या विशेष कालावधीलाही दिले जाते. होळीच्या 8 दिवस आधीच्या काळाला 'होलाष्टक' असे म्हणतात. यंदा मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 पासून होलाष्टक सुरू होत असून ते 3 मार्च 2026 पर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, होलाष्टकाच्या काळात ग्रह अतिशय उग्र स्थितीत असतात.

2/7
सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि राहु या ग्रहांचा स्वभाव या दिवसांत नकारात्मक आणि तापट असतो. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याचे फळ मिळत नाही, उलट संकटांना निमंत्रण मिळते. पौराणिक कथेनुसार, याच 8 दिवसांत हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाचा प्रचंड छळ केला होता.

3/7
लग्नाचे मुहूर्त आणि साखरपुडा: होलाष्टक काळात लग्न, साखरपुडा किंवा लग्नाची बोलणी पूर्णपणे वर्जित आहेत. या काळात जुळलेली लग्ने फार काळ टिकत नाहीत किंवा दाम्पत्य जीवनात सतत कटकटी निर्माण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

4/7
नवीन व्यवसाय आणि नोकरी बदल: जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा नवीन नोकरीत रुजू होण्याचा विचार करत असाल, तर 3 मार्चपर्यंत थांबणे हितकारक ठरेल. या काळात सुरू केलेल्या कामात अपेक्षित यश मिळत नाही आणि आर्थिक नुकसान सोसावे लागते.

5/7
वास्तू खरेदी आणि गृहप्रवेश: नवीन घर खरेदी करणे, जमिनीचे व्यवहार करणे किंवा नवीन घरात प्रवेश करणे या दिवसांत अशुभ मानले जाते. या काळात वास्तू शांती केल्यास त्या वास्तूत नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहण्याची शक्यता असते.

6/7
मुंडन आणि नामकरण संस्कार: हिंदू धर्मातील 16 संस्कारांपैकी कोणतेही संस्कार या काळात करू नयेत. विशेषतः लहान मुलांचे मुंडन किंवा नामकरण या दिवसांत टाळावे.

7/7
मोठी गुंतवणूक आणि वाहन खरेदी: शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करणे किंवा नवीन वाहन खरेदी करणे या काळात टाळावे. ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे या वस्तूंपासून मिळणारे सुख कमी मिळते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

‘ते कुठे गेले?’, अजित पवार यांच्या अपघातानंतर AAIBकडून चार्टर कंपनीची चौकशी सुरू; कर्मचारी बेपत्ता, कार्यालयाचे शटर बंद
‘ते कुठे गेले?’,अपघातानंतर AAIBकडून चार्टर कंपनीची चौकशी; कर्मचारी बेपत्ता
  • अपघातानंतर AAIBकडून चार्टर कंपनीची चौकशी; कर्मचारी बेपत्ता

  • कंपनीच्या कार्यालयातील लोक गायब

  • कार्यालयाचे शटर बंद

View All
advertisement