advertisement

मौनी रॉयपाठोपाठ आता माजी महिला खासदारासोबत स्टेजवर गैरवर्तन; रागाच्या भरात उचललं मोठं पाऊल!

Last Updated:
Mimi Chakraborty Harassment : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मौनी रॉयसोबत एका कार्यक्रमात गैरवर्तनाचा धक्कादायक प्रकार घडला. ही घटना ताजी असतानाच आता प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार मिमी चक्रवर्ती हिच्यासोबत अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे.
1/7
mimi Chakraborty
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मौनी रॉयने हरियाणातील एका कार्यक्रमात तिच्यासोबत झालेल्या धक्काबुक्कीचा आणि गैरवर्तनाचा धक्कादायक खुलासा केला होता. ही घटना ताजी असतानाच आता प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार मिमी चक्रवर्ती हिच्यासोबत एका लाइव्ह इव्हेंटमध्ये अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे.
advertisement
2/7
Mouny Roy mimi
पश्चिम बंगालमधील बोनगाव येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात परफॉर्म करत असताना मिमीचा अपमान करण्यात आला, तिला अर्ध्यावरच स्टेज सोडायला लावलं आणि इतकंच नाही तर माईकवरून तिच्यावर अश्लील कमेंट्सही करण्यात आल्या.
advertisement
3/7
mimi Chakraborty
मिमी चक्रवर्तीला 'नयागोपालगुंज युवक संघ क्लब'ने एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रंगला होता. मिमी स्टेजवर परफॉर्म करत असताना, प्रेक्षक तिच्या गाण्यावर आणि नृत्यावर थिरकत होते. पण अचानक आयोजकांनी तिला कोणतीही पूर्वकल्पना न देता स्टेज सोडून जाण्यास सांगितलं. एका कलाकाराला भर प्रेक्षकांसमोर अशा प्रकारे अपमानित करणं हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांनाही खटकला.
advertisement
4/7
mimi Chakraborty
मिमीने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून आपली व्यथा मांडली आहे. ती म्हणाली, "मी केवळ अपमान सहन करून शांत राहिले नाही, तर जेव्हा मी स्टेजवरून खाली उतरत होते, तेव्हा माईकवर माझ्याबद्दल अत्यंत गलिच्छ आणि अपमानजनक टिप्पणी करण्यात आली. तिथे अनेक चाहते माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि मला भेटण्यासाठी आले होते, त्यांच्यासमोर माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता."
advertisement
5/7
mimi Chakraborty
एका बाजूला आपण देशाच्या स्वातंत्र्याचा आणि समतेचा उत्सव साजरा करत असताना, दुसऱ्या बाजूला महिला कलाकार आजही सुरक्षित आणि सन्मानित नाहीत, याबद्दल मिमीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. ती पुढे म्हणाली, "मी माझं करिअर आणि ओळख स्वतःच्या कष्टाने निर्माण केली आहे. जर आज मी गप्प बसले, तर उद्या पुन्हा कोणत्याही कलाकारासोबत असाच व्यवहार होईल. स्टेजवर स्वतःच्या प्रतिष्ठेशी मी तडजोड करू शकत नाही."
advertisement
6/7
mimi Chakraborty
मिमीने याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात आणि कायदेशीर अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. आयोजकांविरुद्ध कठोर कारवाई होईपर्यंत ती स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही तिने दिला आहे.
advertisement
7/7
mimi Chakraborty
मौनी रॉय आणि आता मिमी चक्रवर्ती यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींसोबत जर सार्वजनिक कार्यक्रमात असं घडत असेल, तर सामान्यांचं काय? असा प्रश्न आता सिनेसृष्टीतून विचारला जात आहे. कोणत्याही इव्हेंटमध्ये महिला कलाकारांची प्रतिष्ठा जपणं ही आयोजकांची प्राथमिक जबाबदारी असते, पण इथे चक्क आयोजकच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
advertisement
‘ते कुठे गेले?’, अजित पवार यांच्या अपघातानंतर AAIBकडून चार्टर कंपनीची चौकशी सुरू; कर्मचारी बेपत्ता, कार्यालयाचे शटर बंद
‘ते कुठे गेले?’,अपघातानंतर AAIBकडून चार्टर कंपनीची चौकशी; कर्मचारी बेपत्ता
  • अपघातानंतर AAIBकडून चार्टर कंपनीची चौकशी; कर्मचारी बेपत्ता

  • कंपनीच्या कार्यालयातील लोक गायब

  • कार्यालयाचे शटर बंद

View All
advertisement