Tips And Tricks : पांढऱ्या कपड्यावर चहा-कॉफीचे डाग पडले? घरातील 'हे' पदार्थ काही मिनिटात करतील गायब!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
White clothes stain removal : पांढरे कपडे घातले की लूक फ्रेश आणि एलिगंट वाटतो, पण थोडासा डाग जरी पडला तरी संपूर्ण लूक बिघडतो. चहा, कॉफी, घाम किंवा धुळीमुळे पांढऱ्या कपड्यांवर पटकन डाग दिसू लागतात.
मुंबई : बऱ्याचदा चहा, कॉफी पिताना पांढऱ्या कपड्यांवर ते सांडल्याने डाग पडतात. हे लगेच उठून दिसतात. असे डाग काढणे अनेकांना कठीण वाटते, पण योग्य पद्धत वापरली तर पांढरे कपडे पुन्हा स्वच्छ आणि चमकदार होऊ शकतात. घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही सोप्या उपायांनी तुम्ही हे डाग सहज दूर करू शकता.
पांढरे कपडे घातले की लूक फ्रेश आणि एलिगंट वाटतो, पण थोडासा डाग जरी पडला तरी संपूर्ण लूक बिघडतो. चहा, कॉफी, घाम किंवा धुळीमुळे पांढऱ्या कपड्यांवर पटकन डाग दिसू लागतात. मात्र योग्य घरगुती उपाय माहित असतील, तर हे हट्टी डाग काढणे अजिबात अवघड राहत नाही. चला पाहूया यावर काही सोपे उपाय.
advertisement
घरातील या वस्तू घालवतील चहा-कॉफीचे हट्टी डाग..
- पांढऱ्या कपड्यांवरील हट्टी डाग काढण्यासाठी ऑक्सिजन बेस्ड ब्लीच हा एक उत्तम पर्याय आहे. सोडियम परकार्बोनेटपासून बनलेले हे ब्लीच डाग प्रभावीपणे काढते आणि कपड्यांना उजळपणा देते. क्लोरीन ब्लीचप्रमाणे हे कापडाचे धागे खराब करत नाही, त्यामुळे बहुतांश पांढऱ्या कपड्यांसाठी ते सुरक्षित मानले जाते.
- बेकिंग सोडा हा आणखी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. अर्धा कप बेकिंग सोडा, एक टेबलस्पून मीठ आणि एक टेबलस्पून हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागांवर लावून १५ ते ३० मिनिटे किंवा गरज असल्यास एक तास ठेवा आणि नंतर कपडे नेहमीप्रमाणे धुवा.
advertisement
- डिस्टिल्ड पांढरा व्हिनेगर पांढऱ्या कपड्यांसाठी खूप उपयुक्त ठरतो. तो डाग काढण्यासोबतच कपड्यांचा पिवळसरपणा कमी करतो आणि दुर्गंधीही घालवतो. गरम पाण्यात थोडा व्हिनेगर मिसळून कपडे एक तास किंवा रात्रभर भिजत ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
- बाजारात मिळणारे व्हाइटनिंग सोल्युशन्सही पांढऱ्या कपड्यांसाठी प्रभावी असतात. हे मिश्रण कपड्यांमधील डाग आणि पिवळसरपणा काढून त्यांना नव्यासारखी चमक देतात. वापरताना पॅकेजवर दिलेल्या सूचनांनुसारच योग्य प्रमाणात वापर करणे महत्त्वाचे आहे.
advertisement
- कपडे धुतल्यानंतर त्यांना उन्हात वाळवणे फायदेशीर ठरते. सूर्यप्रकाश नैसर्गिकरित्या पांढरेपणा वाढवतो आणि कपड्यांना ताजेपणा देतो. मात्र, नाजूक कपड्यांसाठी जास्त कडक ऊन टाळावे.
या सोप्या उपायांचा नियमित वापर केल्यास पांढऱ्या कपड्यांवरील डाग सहज निघतात. थोडी काळजी आणि योग्य पद्धत अवलंबली, तर तुमचे पांढरे कपडे नेहमीच स्वच्छ, उजळ आणि आकर्षक दिसतील.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 6:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : पांढऱ्या कपड्यावर चहा-कॉफीचे डाग पडले? घरातील 'हे' पदार्थ काही मिनिटात करतील गायब!










