Ajit Pawar : अजित पवारांचा 'तो' व्हिडिओ, अख्खा महाराष्ट्र पोट धरून हसलेला, काय होतं त्या VIDEO त?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अजित पवार यांच्या एका विधानाने अख्खा महाराष्ट्र खळखळून हसला होता.त्यामुळे या व्हिडिओमध्ये नेमके काय आहे? हे जाणून घेऊयात.
Ajit Pawar News : राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघातात मृत्यू झाला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत येत असताना अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. अजितदादांच्या या निधनाने पवार कुटुंबियांसह संपूर्ण बारामती आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.तसेच सोशल मीडियावर देखील अजितदादांच्या निधनाचे पोस्ट शेअर केली जात आहेत. असे असतानाच आता अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अजित पवार यांच्या एका विधानाने अख्खा महाराष्ट्र खळखळून हसला होता.त्यामुळे या व्हिडिओमध्ये नेमके काय आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर हा व्हिडिओ 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरचा आहे.यामध्ये महायुतीने विधानसभा निवडणूकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सूरू होती. त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सूरू होती. या दरम्यान देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एकत्रित पत्रकार परिषदेत पार पडली होती.या पत्रकार परिषदेतला हा व्हिडिओ आहे.
advertisement
अजित दादा पवार का ये वीडियो आज सबसे अधिक वायरल है
- इनका भले शाम को पता चले लेकिन मैं तो पक्का DCM पद की शपथ लेने वाला हूं
अजीत दादा पवार की ये बात सुनकर देवेंद्र जी, शिंदे जी और सारे पत्रकार हंस पड़े थे
बेवाक नेता थे Ajit Pawar pic.twitter.com/YZTG3ZvlYW
— Abhay Pratap Singh (बहुत सरल हूं) (@IAbhay_Pratap) January 28, 2026
advertisement
या व्हिडिओमध्ये एक पत्रकार एकनाथ शिंदे यांना विचारतो, उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.तर मग तुम्ही (एकनाथ शिंदे) आणि अजित पवार उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहात का? यावर एकनाथ शिंदे म्हणतात, देवेंद्र फडणवीसांनी आताच तुम्हाला सांगितलं आणि संध्याकाळपर्यंत थांबा तुम्हाला सगळं कळून जाईल, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी लपवण्याचा प्रयत्न केला. पण एकनाथ शिंदे बोलत असताना अजित पवार यांनी मागून संध्याकाळी त्यांचे कळेल पण मी तर उप मुख्यमंत्रीपदाची शतथ घेणार आहे,असे अजित पवार यांनी उघडपणे पत्रकार परिषदेत सांगून टाकताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला होता.
advertisement
अजित दादांचा हा मिश्किल अंदाज पाहून एकनाथ शिंदे देखील शांत राहिले नाही, आणि म्हणाले 'दादांना अनुभव आहे संध्याकाळी आणि सकाळीही शपथविधी घेण्याचा'(एकंदरीत एकनाथ शिंदे यांना अजित दादांच्या 2019 सालच्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली होती.त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार होते) यानंतर अजित दादांपासून देवेंद्र फडणवीस आणि सगळेच नेते खळखळून हसले होते. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 6:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : अजित पवारांचा 'तो' व्हिडिओ, अख्खा महाराष्ट्र पोट धरून हसलेला, काय होतं त्या VIDEO त?








