Korean Tops : कोरियन टॉप्सची जोरदार क्रेझ, फक्त 300 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईत हे लोकेशन
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
कोरियन टॉप्स फक्त 300 रुपयांपासून उपलब्ध असल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : तरुणींमध्ये सध्या कोरियन फॅशन टॉप्सची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. स्टायलिश लुक, ट्रेंडी डिझाइन आणि आरामदायी फॅब्रिक यामुळे हे टॉप्स तरुणींच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. विशेष म्हणजे दादर पूर्व भागातील एका स्टॉलवर हे कोरियन टॉप्स फक्त 300 रुपयांपासून उपलब्ध असल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
दैनंदिन वापरापासून कॉलेज, ऑफिस तसेच प्रवासासाठी उपयुक्त असे विविध प्रकारचे टॉप्स या स्टॉलवर पाहायला मिळतात. रंगसंगती, आकर्षक डिझाइन आणि उत्तम फिनिशिंग यामुळे हे टॉप्स तरुणींना सहज आकर्षित करत आहेत. परवडणारी किंमत असूनही दर्जेदार गुणवत्ता मिळत असल्याने या स्टॉलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
advertisement
येथे उपलब्ध असलेले टॉप्स जीन्स, स्कर्ट तसेच फॉर्मल वेअरसोबत सहज जुळवून घेता येतात. त्यामुळे एकाच टॉपचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करता येतो ही बाब तरुणींना अधिक भावत आहे. या कोरियन टॉप्समध्ये कॉटन, सिल्क, खादी कॉटन आणि जॉर्जेटसारख्या विविध फॅब्रिकचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे टॉप्स केवळ फॅशनेबलच नाहीत तर घालायला अत्यंत आरामदायी देखील आहेत.
advertisement
या स्टॉलवर केवळ टॉप्सच नव्हे तर आकर्षक प्रिंट असलेले काही शर्ट्सदेखील उपलब्ध आहेत. हे शर्ट्स सुद्धा 300 रुपयांपर्यंतच्या दरात मिळत असून त्यांवरील सुंदर प्रिंट्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सध्या उपलब्ध साइज M ते XXL पर्यंत असल्याने विविध शरीरयष्टीच्या तरुणींना येथे योग्य पर्याय मिळतो.
दादर पूर्व येथील बाळकृष्णलाल कंपनीच्या समोर आणि महाराष्ट्र बँकेच्या बाहेर असलेला हा स्टॉल फॅशनप्रेमी तरुणींसाठी एक आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. कमी किमतीत ट्रेंडी, स्टायलिश आणि कम्फर्टेबल कोरियन टॉप्स मिळत असल्याने या स्टॉलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आगामी काळातही ही क्रेझ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 6:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Korean Tops : कोरियन टॉप्सची जोरदार क्रेझ, फक्त 300 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईत हे लोकेशन








