Success Story : व्यवसायासाठी बहिणींनी नोकरी सोडली, सुरू केला मोमोज स्टॉल, महिन्याला 1 लाख कमाई
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
नाशिकमधील दोन उच्चशिक्षित बहिणींनी या रॅट रेसमधून बाहेर पडत स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे.
नाशिक: सध्याच्या स्पर्धेच्या युगात सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांची मोठी धडपड सुरू असते. मात्र, नाशिकमधील दोन उच्चशिक्षित बहिणींनी या रॅट रेसमधून बाहेर पडत स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. एम.एस्सी. फिजिक्स झालेल्या करुणा कटारे आणि एम.एस्सी. फार्मसी अनुभव असलेल्या प्रविणा कटारे यांनी नोकरी सोडून सुरू केलेला बी.के. मोमोज हा ब्रँड आज नाशिककरांच्या पसंतीस उतरत आहे.
नोकरी ते उद्योजिका विचारांची दिशा बदलली
करुणा आणि प्रविणा या दोघीही चांगल्या पगारावर कार्यरत होत्या. मात्र, दुसऱ्यासाठी रात्रंदिवस राबूनही कष्टाच्या तुलनेत मोबदला आणि प्रगती मर्यादित आहे, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आपला वेळ आणि कौशल्य स्वतःच्या व्यवसायासाठी का वापरू नये? या एका विचाराने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली.
advertisement
यूट्यूबपासून सुरू झाला प्रवास
सुरुवातीला यूट्यूबच्या मदतीने मोमोज बनवण्याचे बारकावे त्यांनी आत्मसात केले. वडिलांच्या पश्चात घराची जबाबदारी आईवर होती, अशा परिस्थितीत या बहिणींनी जिद्दीने पाऊल उचलले. एका फूड स्टॉलच्या मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. सुरुवातीला ग्राहक मिळत नसल्याने अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी हार मानली नाही. क्लाउड किचनपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका यशस्वी स्ट्रीट स्टॉलपर्यंत पोहोचला आहे.
advertisement
आर्थिक गणितात मोठी झेप
ज्यावेळी या बहिणी 20 ते 30 हजारांची नोकरी करत होत्या, तिथे आज त्या महिन्याकाठी 1 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवत आहेत. दररोज 50 ते 60 प्लेट्सहून अधिक मोमोजची विक्री करत त्यांनी आपला एक वेगळा ग्राहकवर्ग तयार केला आहे.
कष्ट करण्याची तयारी आणि आईची साथ असेल, तर कोणतंही क्षेत्र छोटं नसतं. स्वतःचा व्यवसाय केल्याचा आनंद आणि त्यातून मिळणारी प्रगती समाधानकारक आहे, असं या दोघी बहिणी अभिमानाने सांगतात.
advertisement
कुठे मिळेल आस्वाद?
जर तुम्हाला या जिद्दी बहिणींच्या हातचे गरमागरम व्हेज मोमोज चाखायचे असतील, तर नाशिकमधील मनपसंद स्वीट्स, पाटील नगर ग्राउंड, सिडको येथे तुम्ही भेट देऊ शकता. तसेच सोशल मीडियावर B.K. Momos या इन्स्टाग्राम पेजवरही त्यांची अधिक माहिती उपलब्ध आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 4:24 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : व्यवसायासाठी बहिणींनी नोकरी सोडली, सुरू केला मोमोज स्टॉल, महिन्याला 1 लाख कमाई







