advertisement

सकाळी सहा वाजता फोन यायचा, DCM बोलणार आहेत, दादांच्या निधनाने कलेक्टरही हळहळले

Last Updated:

भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी समाज माध्यमांवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

अजित पवार-कौस्तुभ दिवेगावकर
अजित पवार-कौस्तुभ दिवेगावकर
बारामती (पुणे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्यासोबत काम केलेले नेते, अधिकारी त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगत आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुणे आणि धाराशिवमध्ये काम करीत असतानाच्या अजित पवार यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देऊन अजित पवार यांना आदरांजली वाहिली आहे.
भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी समाज माध्यमांवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या जाण्याने मोठी प्रशासकीय पोकळी जाणवणार असल्याचे दिवेगावकर यांनी म्हटले. अजित पवार यांच्या प्रशासकीय पकडीवर सगळेच प्रकाश टाकत असताना कौस्तुभ दिवेगावकर यांनीही त्यांना आलेल्या अनुभवांवर लिहिले आहे.

भल्या सकाळीच फोन यायचा...

अजितदादांच्या जाण्याने आपण एक सक्षम प्रशासक गमावला आहे. सकाळी साडे सहा-सात वाजता उपमुख्यमंत्री बोलणार आहेत, असा फोन यायचा. अहो कलेक्टर जिल्ह्याचा असा असा विषय आहे. ते आम्ही देत असलेली माहिती शांतपणे ऐकून घेत. कायद्याचे बारकावे त्यांना माहीत असत. विषयाची माहिती नसेल तर कोणाचीही मोघम माहिती द्यायची हिम्मत होत नसे.
advertisement
त्यांच्या बैठकांची तयारी खूप डिटेलिंगसह करावी लागे. कामाचा उरक आम्हाला आमच्या कार्यपद्धतीचे पुनरावलोकन करायला भाग पाडत असे. कोरोना साथीत आधी पुण्यात नंतर धाराशिव जिल्ह्यात काम करताना त्यांच्या कार्यपद्धतीचा जवळून परिचय झाला. त्यांच्या जाण्याने मोठी प्रशासकीय पोकळी जाणवणार आहे. धक्कादायक. भावपूर्ण आदरांजली... असे कौस्तुभ दिवेगावकर यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
advertisement

अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंतिम संस्कार, शाह बारामतीला येणार

बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानात अजित पवार यांच्यावर गुरूवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारत सरकारमधील अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित राज्यातले सगळेच मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित असतील.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सकाळी सहा वाजता फोन यायचा, DCM बोलणार आहेत, दादांच्या निधनाने कलेक्टरही हळहळले
Next Article
advertisement
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली; सोने आणणाऱ्यांना बसला मोठा झटका
दुबईतून Gold खरेदीचे स्वप्न आता विसरा, एका घटनेमुळे पायाखालची जमीन सरकली
  • दुबईत सोनं खरेदी करणं आता अशक्य

  • सामान्यांना मोठा झटका

  • सर्व गणितं कोलमडली

View All
advertisement