दादांनी माझं ऐकलं असतं तर आज... 27 वर्षापासून दादांसोबत असणाऱ्या ड्रायव्हरची डोळ्यात पाणी आणणारी प्रतिक्रिया
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अजित पवारांनी ऐकले असते तर ही दुर्घटना घडली नसती... असे म्हणत अजित पवारांच्या चालकांच्या अश्रूंचा बांध फुटला.
पुणे : महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवारांच्या अकाली एक्झिटने अवघा महाराष्ट्र आज सुन्न झाला आहे. जिल्हा परिषद निवडणूक प्रचारांसाठी बारामतीला चाललेले अजित पवारांचे विमान कोसळले, त्यात अजित पवारांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनाच्या बातमीनंतर 27 वर्षे अजित पवारांचे सारथ्य करणाऱ्या चालकाची हृदयद्रावक प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवारांनी ऐकले असते तर ही दुर्घटना घडली नसती... असे म्हणत अजित पवारांच्या चालकांच्या अश्रूंचा बांध फुटला.
श्यामराव नारायण मनवे (७१ वर्षे) हे अजित पवारांकडे गेली २७ वर्षे चालक म्हणून काम करत आहेत. श्यामारवा मनवे हे 1999 पासून अजित पवारांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत आहेत. मुंबईतील काल अजितदादांच्या रात्री बैठका संपल्यानंतर आपण रात्रीच बारामतीला कारने जाऊ असे श्यामराव म्हणाले. परंतु अजित पवारांनी त्यांनी नकार दिला आणि म्हणाले, तू पुण्याला ये, मी सभा आटोपून तिथे येतो... दादांच्या पुढे कोण जाणार म्हणून श्यामराव काही म्हणाले नाही. बुधवारी सकाळी ही बातमी समोर येताच त्यांना मोठा धक्का बसला. आता माझं आयुष्य थांबलं आहे, असे म्हणत भावनांना वाट मोकळी करुन दिली.
advertisement
पदाधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव
अजित पवार बुधवारी बारामती दौऱ्यावर होते. बारामतीत लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. बारामतीत आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आली होती. अजित पवारांच्या विमानाचा अपघात बारामती एअरपोर्ट पासून दोन ते तिन किलोमीटर अंतरावर झाला. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. एअरपोर्ट पासून पुढे दोन ते तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले, त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.
advertisement
अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना श्यामराव मनवे म्हणाले की, अजितदादांकडे मी गेली 27 वर्षे चालक म्हणून काम करत आहे. दादा माझे दैवत होते, गणपतीत देखील ते माझ्या घरी जेवायला यायचे. 2013 साली मी निवृत्त झालो, त्यानंतर मी अजित दादांसोबत काम करत आहे. सकाळी 7.30 वाजता दादा बंगल्यावरून निघाले आणि तासाभरात ही बातमी आली. जर दादांनी काल ऐकले असते तर आज हे घडलेच नसते. दादांनी आमचे ऐकायले हवे होते, असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले. श्यामराव मनवे यांनी लोकमतशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
advertisement
सुनेत्रा पवार कोलमडल्या
विमान दुर्घटनास्थळावरून अजित पवार यांचं पार्थिव प्रथम रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथं त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार कोलमडलेल्याच अवस्थेत बारामतीत दाखल झाल्या. यावेळी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होते. सुनेत्रा पवार यांच्या मनातील घालमेल त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसली आणि या भेटीदरम्यानचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होताच ते पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात कालवाकालव झाली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 10:47 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
दादांनी माझं ऐकलं असतं तर आज... 27 वर्षापासून दादांसोबत असणाऱ्या ड्रायव्हरची डोळ्यात पाणी आणणारी प्रतिक्रिया








