'आता मोकळा श्वास घेता येईल', अरिजीत सिंगच्या रिटायरमेंटवर खुश झाली बॉलिवूड सिंगर, सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Arijit Singh Retirement: चाहते डोळ्यांत पाणी आणून 'अरिजीत परत ये' अशी विनवणी करत असतानाच, आपल्या सडेतोड स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या गायिका सोना महापात्रा हिने मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
advertisement
advertisement
ती म्हणते, "अरिजीतचा हा निर्णय म्हणजे केवळ कामातून बाहेर पडणं नाही, तर ते क्रिएटिव्हिटी आणि स्वातंत्र्याकडे टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. प्लेबॅकच्या चौकटीत अडकून राहण्यापेक्षा स्वतःचं संगीत शोधणं हे जास्त महत्त्वाचं असतं. अरिजीतने आजवर जे केलं, ते यापूर्वी कुणीही धाडस दाखवलं नव्हतं." सोनाच्या मते, अरिजीत आता स्वतःच्या अटींवर संगीत तयार करेल आणि हाच खऱ्या कलाकाराचा विजय आहे.
advertisement
अरिजीतने निवृत्ती का घेतली, यावर बोलताना सोनाने इंडस्ट्रीतील एका काळ्या सत्यावर बोट ठेवलं. ती म्हणाली, "प्रोड्यूसर्सना नवीन आवाजांचा प्रयोग करायची भीती वाटते. ते झीरो-रिस्क धोरण अवलंबतात. दहा नवीन मुलांकडून डेमो रेकॉर्ड करून घेतात, त्यांना पैसेही देत नाहीत आणि शेवटी सुरक्षित पर्याय म्हणून अरिजीतकडे जातात. यामुळे नवीन टॅलेंट दबून जातं आणि प्रस्थापित गायकावर कामाचा अवाढव्य ताण येतो. अरिजीतच्या या निर्णयामुळे हे शोषणाचं चक्र कुठेतरी थांबेल अशी आशा आहे."
advertisement
सोनाने पुढे स्पष्ट केलं की, संगीत दिग्दर्शक आणि निर्माते संधी देण्याच्या नावाखाली अनेक गायकांना मोफत राबवून घेतात. आता अरिजीतसारखा मोठा गायक बाजूला झाल्यामुळे त्या सावलीत दबलेल्या छोट्या आणि नव्या गायकांना मोकळा श्वास घेता येईल. अरिजीत आता स्वतःचं स्वतंत्र संगीत जगासमोर आणणार आहे, हे ऐकून सोनाने आपला उत्साह व्यक्त केला.
advertisement









