advertisement

Ajit Pawar: 'अरे कसा आहे, मला येऊन भेट' आता दादा भेटणार नाही, हसवणारा 'माणूस' रडवून गेला, VIDEO

Last Updated:

जाहीर भाषणामध्ये अजितदादांची फटकेबाजी म्हणजे जणू मेजवानीचं होती. कधी कार्यकर्त्यांना फटकारणं असेल, कधी कुणाची फिरकी घेणं असेल किंवा विरोधकांना टीका असेल

News18
News18
पुणे : सभा असो की पत्रकार परिषद परखड आणि स्पष्टपणे बोलणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. जाहीर भाषणामध्ये अजितदादांची फटकेबाजी म्हणजे जणू मेजवानीचं होती. कधी कार्यकर्त्यांना फटकारणं असेल, कधी कुणाची फिरकी घेणं असेल किंवा विरोधकांना टीका असेल अजितदादांनी भाषण करणं अन् हश्शा आणि टाळ्यांचा कडकडाट होणं हे समीकरण बनलं होतं. पण, आता हा आवाज कायमचा हरपला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आहे. बारामती विमानतळावर अजितदादांच्या विमान क्रॅश झालं. या अपघातात अजितदादांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अजितदादा असं सोडून जातील, यावर कुणालाही विश्वास बसत नाही. मुळात अजितदादांची कामाचा माणूस अशी ओळख होती. कुणाचंही काम असेल आणि अजितदादा त्याला नाही म्हणाले, असा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. खास करून सभा असेल तर अजितदादांचे कार्यकर्ते त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायचे. अजितदादांचं भाषण हे कार्यकर्त्यांसाठी मेजवानीच होती.
advertisement
एवढंच नाहीतर सत्ताधारी आणि विरोधकांनाही अजितदादा आपल्या भाषणातून चांगलंच फटकारून काढायचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांची पत्रकार परिषद होती. एकीकडे एकनाथ शिंदे कधी शपथ घेणार याबद्दल सांगत नव्हते, तर त्याचवेळी अजितदादा, 'यांचं माहिती नाही, पण मी तर शपथ घेणार आहे' असं म्हणून गंभीर झालेल्या पत्रकार परिषदेत सगळ्यांना हसवून सोडायचे.
advertisement
'अरे कसा आहेस, मला येऊन भेट' आपली बहिण आणि खासदार सुप्रिया सुळे यांना अजितदादांनी सभेतून टोला लगावला होता. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. तसंच, बारामतीच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार सभेत रडले होते. आता अजितदादांनी 'इथं येऊन एक पठ्याने रडून दाखवलं होतं, आता मी पण रडून दाखवतो, मला पण मत द्या' असं म्हणताच सभेत एकच हश्शा पिकली होती.
advertisement
विशेष म्हणजे, जनता दरबार कार्यक्रमात अजितदादा हे सगळ्यांचं ऐकून घ्यायचे आणि काम होणार असं आश्वासनही द्यायचे. आज अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे कार्यकर्ते भावनाविव्हश झाले आहे. सोशल मीडियावर अजितदादांच्या भाषणाचे रिल्स आणि व्हिडीओ शेअर करून कार्यकर्ते असा कामाचा माणूस होणे नाही, अशी प्रतिक्रिया देत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: 'अरे कसा आहे, मला येऊन भेट' आता दादा भेटणार नाही, हसवणारा 'माणूस' रडवून गेला, VIDEO
Next Article
advertisement
दिग्गज कंपनीचा महाभयंकर निर्णय; 16,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, आतापर्यंत 30 हजार कुटुंबांवर आभाळ कोसळलं
दिग्गज कंपनीचा महाभयंकर निर्णय; 16,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
  • 16 हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात नारळ

  • एका ई-मेलने उध्वस्त झालं घर…

  • जगभरातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

View All
advertisement