Suryakumar Yadav : सूर्याच्या विकेटवरून मोठा वाद, कॅप्टन आऊट का नॉट आऊट? पाहून तुम्हीच सांगा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
विशाखापट्टणम : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या विकेटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. इनिंगच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये जेकब डफीच्या बॉलिंगवर सूर्यकुमार यादवने सरळ शॉट मारला, त्यानंतर डफीने जमिनीच्या जवळ कॅच पकडला. मैदानातले दोन्ही अंपायर डफीच्या कॅचबद्दल साशंक होते, त्यामुळे त्यांनी थर्ड अंपायरला निर्णय घ्यायला सांगितलं.
थर्ड अंपायरने रिप्ले पाहिल्यानंतर सूर्यकुमार यादवला आऊट दिलं. 8 बॉलमध्ये 8 रन करून सूर्यकुमार यादव आऊट झाला, या इनिंगमध्ये त्याने 2 फोर मारल्या होत्या. 216 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियासाठी हा दुसरा धक्का होता. याआधी ओपनर अभिषेक शर्मा पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला होता.
Captain Suryakumar Yadav 8 balls 8 runs and Abhishek Sharma 1 ball 0 runs, both players out #indvsnz4tht20 #abhisheksharma #SuryakumarYadav pic.twitter.com/4VwggiTXqf
— Pramod sahu (@PramodK08555177) January 28, 2026
advertisement
न्यूझीलंडने उभारला डोंगर
या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 215 रन केले. न्यूझीलंडचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्धचा हा दुसरा सगळ्यात मोठा स्कोअर आहे. न्यूझीलंडकडून टीम सायफर्टने 36 बॉलमध्ये 62 रनची खेळी केली, ज्यात 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय डॅरेल मिचेलने 18 बॉलमध्ये नाबाद 39 रन केले. मिचेलने त्याच्या खेळीमध्ये 3 सिक्स आणि 2 फोर मारल्या. डेवॉन कॉनवेनेही 23 बॉल 44 आणि ग्लेन फिलिप्सने 16 बॉल 24 रनची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंगने 2 आणि कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या. याशिवाय बुमराह आणि बिष्णोईला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाने आधीच 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने टीममध्ये एक बदल केला आहे. इशान किशनला विश्रांती देऊन अर्शदीप सिंगची टीममध्ये निवड केली गेली.
Location :
Visakhapatnam,Andhra Pradesh
First Published :
Jan 28, 2026 9:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : सूर्याच्या विकेटवरून मोठा वाद, कॅप्टन आऊट का नॉट आऊट? पाहून तुम्हीच सांगा!








