मी अजून सांगतोय तातडीने करार करा, नाही तर भयानक हल्ला करू; ट्रम्प यांची थेट धमकी, अमेरिका–इराण तणाव टोकाला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
US vs Iran: इराणच्या अणु कार्यक्रमावरून अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा टोकाला पोहोचला असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे.
तेहरान: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट आणि तीव्र इशारा दिला आहे. इराणने आपल्या वादग्रस्त अणु कार्यक्रमावर अमेरिकेशी तातडीने करार केला नाही, तर मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेश ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांनी Truth Socialवरील पोस्टमध्ये म्हटले की, एक “भव्य आर्माडा” इराणच्या दिशेने कूच करत आहे. हे लष्करी दल वेग, प्रचंड शक्ती, उत्साह आणि ठराविक उद्दिष्टांसह पुढे सरकत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे बेडे व्हेनेझुएलासाठी पाठवलेल्या लष्करी दलापेक्षा मोठे असून, त्याचे नेतृत्व एअरक्राफ्ट कॅरियर ‘अब्राहम लिंकन’ करत आहे.
‘वेळ संपत चालली आहे’
ट्रम्प यांनी पुढे स्पष्ट केले की, जसे व्हेनेझुएलाच्या प्रकरणात झाले, तसेच हे लष्करी दलही तयार, सक्षम आणि गरज पडल्यास वेगाने व तीव्र कारवाई करण्यास समर्थ आहे. “इराणने चर्चेच्या टेबलवर यावे आणि अण्वस्त्र कार्यक्रमावर न्याय्य आणि संतुलित करार करावा,” असे आवाहन करताना ट्रम्प यांनी ठामपणे म्हटले की,
advertisement
“वेळ संपत चालली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे.”
‘यावेळी हल्ला अधिक भयानक असेल’
ट्रम्प यांनी इराणला आठवण करून दिली की, “मी आधीही सांगितले होते—DEAL करा! त्यांनी ऐकले नाही आणि त्यानंतर ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ झाले, ज्यात इराणचे मोठे नुकसान झाले.” यावेळी करार झाला नाही; तर पुढचा हल्ला यापेक्षा कितीतरी अधिक भयानक असेल, असा इशाराही त्यांनी दिला.
advertisement
काय होते ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’?
जून 2025 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर’ अंतर्गत, इराणमधील काही प्रमुख अणु केंद्रांवर हल्ले करण्यात आले होते. अमेरिकेच्या मते या ठिकाणी युरेनियम समृद्धीकरण करून अण्वस्त्रांसाठी तयारी केली जात होती.
याआधीही दिला होता इशारा
इराणला दिलेली ही पहिलीच धमकी नाही. यापूर्वीही ट्रम्प यांनी अमेरिकी लष्करी साधनसामग्री मध्य पूर्वेकडे पाठवली जात असल्याचे सांगितले होते. त्या वेळी त्यांनी आशा व्यक्त केली होती की, ही शक्ती वापरण्याची वेळ येणार नाही. मात्र त्या इशाऱ्याच्या दिवशीच इराणमध्ये देशव्यापी आंदोलनांचे वातावरण असल्याचेही वृत्त होते.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 28, 2026 9:09 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
मी अजून सांगतोय तातडीने करार करा, नाही तर भयानक हल्ला करू; ट्रम्प यांची थेट धमकी, अमेरिका–इराण तणाव टोकाला










