advertisement

दादांच्या निधनावर दीदींची शंका, शरद पवार तातडीने माध्यमांसमोर, ममता बॅनर्जींना सुनावलं

Last Updated:

अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवारांचे काका शरद पवार अखेर माध्यमांसमोर आले आणि शरद पवारांनी उत्तर दिले आहे.

News18
News18
पुणे :  अजित पवारांच्या विमान अपघातानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संशय व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशीची मागणी केली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली दौरा रद्द केला. ममता म्हणाल्या, कोणीही सुरक्षित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली योग्य चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यानंतर अजित पवारांचा अपघात हा घातपात आहे की काय अशा विविध चर्चांना उधाण आले. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवारांचे काका शरद पवार अखेर माध्यमांसमोर आले आणि शरद पवारांनी उत्तर दिले आहे. तसेच यामध्ये राजकारण नको, असे आवाहन देखील केले आहे.
अजितच्या मृत्यूमुळे आम्हाला सगळ्यांना यातना झाल्या आहेत. यामागे कोणतंही राजकारण नसून हा निव्वळ अपघात आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकारण आणू नये असं आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जे काही नुकसान झालंय ते भरून निघणार नाही असंही ते म्हणाले.

शरद पवार नेमकं काय म्हणले?

advertisement
अजित पवारांच्या निधनाबाबत शरद पवारांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.
advertisement

काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी?

हा केवळ अपघात असू शकत नाही. त्यामुळे या विमान अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी. आम्हाला कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणांवर विश्वास राहिलेला नाही. विद्यमान उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघातामुळे गंभीर प्रश्न निर्माण होतात. याचे सत्य बाहेर आले पाहिजे. अजित पवार महायुती आघाडीमध्ये नाराज होते, ते महायुती सोडणार होते आणि लवकरच एक मोठा राजकीय निर्णय घेणार होते.
advertisement

घड्याळावरुन ओळख पटली

बारामतीच्या गोजुबावीतील डोंगरावर सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी हे विमान कोसळलं. हा अपघात इतका भीषण होता की विमानातील अजित पवारांसह असलेल्या पाचही जण होरळून मृत्यूमुखी पडले..
विमानाच्या स्फोटामुळे विमानं पूर्णपणे जळून खाक झालं होतं.. अशा परिस्थिती मृतदेहांची ओळख पटवणंही अवघड बनलेलं. पण, अजित पवारांच्या हातावरची घड्याळावरुन त्यांची ओळख पटल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
advertisement
:
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादांच्या निधनावर दीदींची शंका, शरद पवार तातडीने माध्यमांसमोर, ममता बॅनर्जींना सुनावलं
Next Article
advertisement
दिग्गज कंपनीचा महाभयंकर निर्णय; 16,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, आतापर्यंत 30 हजार कुटुंबांवर आभाळ कोसळलं
दिग्गज कंपनीचा महाभयंकर निर्णय; 16,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
  • 16 हजार कर्मचाऱ्यांना एका झटक्यात नारळ

  • एका ई-मेलने उध्वस्त झालं घर…

  • जगभरातील कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

View All
advertisement