दिरावर जीव जडला, नवऱ्याचाच काटा काढला, जालन्यात सख्खा भाऊच झाला वैरी, गोणीत...
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jalna News: जालन्यात दीर-भावजय आणि भावा-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीये. वहिणीवरील प्रेमासाठी लहान भावानंच भावाचा काटा काढला.
जालनाः दीर-भावजय आणि भावा-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना जालन्यात घडलीये. वहिणीच्या प्रेमासाठी लहान भावानंच मोठ्या भावाचा काटा काढल्याने खळबळ उडाली आहे. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे हा धक्कादायक प्रकार घडला. अनैतिक संबंधाला अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीने दिराच्या सोबत मिळून खून केला.
बदनापूर तालुक्यातील निकळज शिवारामधील वाला-सोमठाणा तलावात 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळच्या सुमारास एक अज्ञात मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तपास सुरू झाला. गुरुवारी 13 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार खून केल्यानंतर मृतदेह गोणीत भरून तलावात फेकल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
तलावात आढळलेला मृतदेह मुरघासाच्या प्लास्टिकच्या बोरीत बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले होते. याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने प्रेत बाहेर काढून ओळख पटवली असता मृतदेह सोमठाणा येथील परमेश्वर राम तायडे (वय 30) यांचा असल्याचे समोर आले.
प्राथमिक तपासात हा खून असून मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी बोरीत टाकून दगड बांधून तलावात फेकल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात मृताचे वडील राम नाथा तायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून काही तासांतच मृताचा भाऊ ज्ञानेश्वर तायडे (वय 28) व ज्ञानेश्वरची पत्नी मनिषा तायडे (वय 25) यांना ताब्यात घेतले.
advertisement
पोलिसांच्या चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. मृत परमेश्वर हा मनिषा व तिचा दिर ज्ञानेश्वर यांच्या अनैतिक संबंधांना अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी 15 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह प्लास्टिकच्या बोरीत टाकून तोंड दोरीने बांधले व तलावात फेकून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Nov 14, 2025 9:26 AM IST









