मुलगी घर सोडून BF सोबत गेली, आईनं मृत्यूला कवटाळलं, संभाजीनगरमधील मन हेलावणारी घटना!

Last Updated:

छत्रपती संभाजीनगरमध्ये 20 वर्षीय मुलगी घर सोडून निघून गेल्याच्या विरहातून मुलीच्या आईनं आयुष्याचा शेवट केल्याची घटना समोर आली आहे.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छ. संभाजीनगर: 20 वर्षीय मुलगी घर सोडून निघून गेल्याच्या विरहातून मुलीच्या आईनं आयुष्याचा शेवट केल्याची घटना समोर आली आहे. मुलगी विवाहित असूनही ती अन्य एका तरुणासोबत राहायला निघून गेली. घरच्यांनी तिला परत बोलवण्याचा प्रयत्न केला. पण ती आलीच नाही. उलट तिने पोलीस ठाण्यात जाऊन आपण स्वमर्जीने आलो असून घरी जाण्याची इच्छा नाही, असं सांगितलं. मुलीचं हे वागणं जिव्हारी लागल्याने महिलेनं आयुष्याचा शेवट केला आहे.

नेमकी घटना काय घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित मुलगी घर सोडून बुलढाणा जिल्ह्यातील एका मुलासोबत राहायला गेली. यात कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार करून मुलीला परत आणण्याची विनंती केली. मात्र, मुलीने स्वमर्जीने गेल्याचे सांगून परत येण्यास नकार दिला. पोलिसांनी वेळेत मदत न केल्याने तणावाखाली जाऊन मुलीच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली.
गुरुवारी सायंकाळी 7 वाजता घडलेल्या या घटनेनंतर संतप्त कुटुंबाने मृतदेहासह उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दोन तास ठिय्या दिला. अखेर मध्यरात्री तरुणासह त्याच्या कुटुंबावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेत ठाणे सोडले आणि तणाव निवळला.
advertisement

कुटुंबाला न सांगता घर सोडलं

उस्मानपुरा परिसरात राहणारी 20 वर्षीय विवाहित तरुणी 8 नोव्हेबर रोजी कुटुंबाला काहीही न सांगता घर सोडून निघून गेली. तिच्या पतीने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तपासात मुलगी रमानगरमधील वैभव बोर्डे याच्यासोबत बुलढाण्याला गेल्याचे समजले. त्यांनी उस्मानपुरा पोलिसांना मुलीला परत आणून देण्याची विनंती केली. ही बाब कळताच वैभव बोर्डे मुलीसह बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. तेथे मुलीने पोलिसांसमोर ती स्वमर्जीने वैभवसोबत गेली असून कुटुंबाकडे परत न जाण्याचा जबाब लिहून दिला. विवाहित मुलगी घर सोडून निघून गेली. तिचे बोर्डे कुटुंबाकडून बरेवाईट होण्याच्या भीतीने तिची आई चिंतित होती. मुलगी परत येत नसल्याचे कळाल्याने ती अधिक तणावाखाली गेली. गुरुवारी मुलीच्या 50 वर्षीय आईने राहत्या घरात गळफास घेतला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलगी घर सोडून BF सोबत गेली, आईनं मृत्यूला कवटाळलं, संभाजीनगरमधील मन हेलावणारी घटना!
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement