advertisement

कुठे नेऊन ठेवल्या शाळा? पाकिस्तानी आर्मीच्या गाण्यावर पोरं नाचली, मुख्याध्यापक आणि शिक्षकाला प्रकरण भोवलं, गुन्हे दाखल

Last Updated:

या प्रकरणी भाजप नेते गोपाळ कलाने यांनी उमरखेड पोलिसांत तक्रार दाखल केली होती.  कलाने यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी 12 फेब्रुवारी रोजी

News18
News18
भास्कर मेहरे, प्रतिनिधी
उमरखेड : राज्यभरात सध्या शाळांमध्ये स्पर्धा आणि स्नेह संमेलन कार्यक्रमाचा हंगाम सुरू आहे. अशातच यवतमाळमधील उमरखेड इथं एका शाळेमध्ये चक्क पाकिस्तानी देशभक्ती गीत गायन आणि नृत्य करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी भाजप नेत्यांनी तक्रार केली होती. अखेरीस या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापक आणि एका शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील अब्दुल गफूर शाह नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक २ मध्ये हा प्रकार घडला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.  अब्दुल गफूर शाह नगरपरिषद उर्दू शाळेत  २६ जानेवारी रोजी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला होता. यावेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर गायन आणि नृत्य केलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती.
advertisement
या प्रकरणी भाजप नेते गोपाळ कलाने यांनी उमरखेड पोलिसांत तक्रार दाखल केली होती.  कलाने यांच्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी 12 फेब्रुवारी रोजी रात्री मुख्याध्यापक आणि एका शिक्षका विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 196 (1)(c) नुसार गुन्हे दाखल केले. मुख्याध्यापक अन्सार उल्ला खान अब्दुल खान आणि शिक्षक मोहम्मद फिरोज आशा जी अशी गुन्हे दाखल झालेल्या शिक्षकांची नाव आहे.
advertisement
पाकिस्तानी सैन्याचं गाणं
या स्नेहसंमेलनात "ये मर्द ये मुजाहिद, तेरी अल्गार क्या है" हे गाणं गायलं गेलं आणि त्यावर नृत्य करण्यात आलं होतं. हे गाणं पाकिस्तानसाठी लष्करी स्फूर्तीगीत म्हणून ओळखलं जातं, जे देशभक्तीचा भाव जागृत करणारे आहे. कलाने यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, "शाळेच्या कार्यक्रमात अशा प्रकारचे पाकिस्तानी गाणं गायन आणि नृत्य करणे अनेकांच्या भावना दुखावणारे आणि देशद्रोही आहे". भाजप नेत्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हे स्नेहसंमेलन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होते. यामुळे स्थानिक पातळीवरून निषेधाची लाट उसळली असून, सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा होत आहे. उमरखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून , पुढील तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुठे नेऊन ठेवल्या शाळा? पाकिस्तानी आर्मीच्या गाण्यावर पोरं नाचली, मुख्याध्यापक आणि शिक्षकाला प्रकरण भोवलं, गुन्हे दाखल
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement