अरेंज नाही लव्ह मॅरेज, दीड वर्षे डेटिंग; गायत्री दातारने कसा पटवला बॉम्बे IIT टॉपर? सॉलिड आहे Love Stroy
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Gayatri Datar Love Story : गायत्री दातारचा नवरा श्रीकांत चौरे हा बॉम्बे IIT टॉपर आहे. दोघे दीड वर्ष डेटींग करत आहेत. दोघांची भेट नेमकी कुठे झाली? सॉलिड आहे दोघांची लव्ह स्टोरी.
छोट्या पडद्यावर लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिनं काही महिन्यांआधीच तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत गायत्रीनं प्रेमाची कबूली दिली. श्रीकांत चौरे असं गायत्रीच्या नवऱ्याचं नाव आहे. दोघांच्या लग्नाची सुपारी फुटली आहे. गायत्रीचा नवरा बॉम्बे आयआयटी टॉपर आहे. गायत्रीला कुठे भेटला आयआयटी टॉपर नवरा?
advertisement
गायत्री आणि श्रीकांत मागील दीड वर्षांपासून डेटिंग करत आहेत. लव्ह स्टोरी सांगत गायत्रीचा नवरा म्हणाला, "आम्ही एकमेकांना गेल्या दीड वर्षांपासून डेट करतोय. आम्ही बम्बल या डेटिंग अ‍ॅपवर भेटलो. मी जास्त मराठी शो बघत नाही. जेव्हा गायत्रीच्या मालिका सुरू होत्या, तेव्हा मी जपानमध्ये कामाला होतो. तिच्या कामाबद्दल फारशी कल्पना नव्हती."
advertisement
डेटिंग अॅपवर बोलायला सुरुवात केली तेव्हा गायत्रीने तिचं नाव फक्त ‘मी गायत्री आहे’ इतकंच तिनं सांगितलं होतं. श्रीकांतने तिला तू काय करतेस असं विचारलं तेव्हा तिने घरातील टीव्हीचा फोटो पाठवला. श्रीकांत म्हणाला, "तिने मला घरात टीव्ही पाहतानाचा एक फोटो पाठवला. त्यात खाली एक पाटी ठेवली होती 'गायत्री दातार.' लोक घराच्या दारावर पाटी लावतात, हिच्या नावाची पाटी घरात का आहे? ती ‘बिग बॉस’च्या घरातली नेमप्लेट होती. मी तेव्हा हिच्याबद्दल थोडं सर्च केलं. मग मला समजलं ही अभिनेत्री आहे."
advertisement
गायत्री म्हणाली की, "मी माझ्या मित्र-मैत्रिणींमुळे डेटिंग अ‍ॅप डाऊनलोड केलं होतं. बऱ्याच लोकांनी मला ओळखलं. पण, मला कोणत्याही फॅनबॉयला भेटण्याची इच्छा नव्हती. कोणीतरी माझा फॅन आहे म्हणून आपण डेटवर चाललोय हे मला नको होतं. मी एक-दोन डेट्सवर सुद्धा गेले होते पण आमच्या व्हाइब्स मॅच झाल्या नाहीत. त्यानंतर मग मी श्रीकांतचं प्रोफाइल पाहिलं. आमचं बोलणं सुरू झाल्यावर मी त्याला माझं नावही सांगितलं नव्हतं, माझा नंबर सुद्धा दिला नव्हता. आम्ही डेटिंग अ‍ॅपवरच चॅट करायचो."
advertisement
advertisement
श्रीकांत म्हणाला, "मला पहिल्या एक-दोन महिन्यांतच समजलं होतं की, आमचं छान जमेल. आम्ही एकदा लोणावळ्याला गेलो होतो. त्यावेळी तिने मनातल्या सगळ्या भावना बोलून दाखवल्या होत्या." गायत्रीनं सांगितलं, "मला एक दिवस असं मनापासून वाटलं की, आता करुयात लग्न. लोणावळ्यात मी त्याला अचानक बोलले की, आता आपण घरी वगैरे सांगूयात."
advertisement
गायत्री आणि श्रीकांत यांनी त्यांच्या घरी सांगितलं. तेव्हा गायच्रीचा चला भावा सिटीत हा शो सुरू होता. गायत्रीनं घरी सांगितलं तेव्हा तिचे वडील आणि श्रीकांत यांचा दीड तास फोन झाला. तिच्या वडिलांनी तिच्या कामाबद्दल सगळं काही श्रीकांतला सांगितलं होतं. गायत्री म्हणाली, "आमच्या दोघांच्याही घरी विरोध, ड्रामा असं कुठेच काही झालं नाही. दोन्ही कुटुंब भेटली आणि सगळं एकदम छान झालं."









