advertisement

महाशिवरात्रीला पहिल्यांदाच करणार आहेत उपवास? न चुकता पाळा 'हे' नियम, नेहमीच राहील महादेवाची कृपा!

Last Updated:
उद्या रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा होत आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत खास असतो. अनेक तरुण आणि नवखे भक्त यंदा पहिल्यांदाच हे व्रत धरण्याच्या विचारात असतील.
1/7
उद्या रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा होत आहे. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत खास असतो. अनेक तरुण आणि नवखे भक्त यंदा पहिल्यांदाच हे व्रत धरण्याच्या विचारात असतील. महाशिवरात्रीचे व्रत हे केवळ उपाशी राहणे नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच उपवास करत असाल, तर काही शास्त्रीय नियम आणि आरोग्याशी संबंधित खबरदारी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमची भक्ती आणि आरोग्य दोन्ही जपले जाईल.

2/7
पहाटे स्नान आणि संकल्प: सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि महादेवासमोर हात जोडून 'मी आज महाशिवरात्रीचे व्रत करत आहे, ते निर्विघ्न पार पडू दे' असा संकल्प करावा. शक्य असल्यास पांढरे किंवा स्वच्छ सुती कपडे परिधान करावेत.

3/7
आहाराचे नियम: पहिल्यांदाच उपवास करणाऱ्यांनी दिवसभर स्वतःला हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे. दूध, दही, ताक, फळे, साबुदाणा खिचडी, वरई, शेंगदाणे आणि बटाटा. मिठासाठी 'सैंधव मिठाचा' वापर करावा.गहू, तांदूळ, डाळी, कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णपणे टाळावा.

4/7
शिवलिंग पूजेतील खबरदारी: शिवलिंगावर अभिषेक करताना काही चुका टाळाव्यात. महादेवाच्या पूजेत कधीही हळद, कुंकू आणि केतकीचे फूल वापरू नये. केवळ भस्म, पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र अर्पण करताना ते फाटलेले नसावे याची काळजी घ्या.

5/7
जलाभिषेक आणि मंत्रजप: दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करत राहावा. यामुळे मन शांत राहते आणि भूक-तहानेचा त्रास जाणवत नाही. मंदिरात जाऊन जलाभिषेक करणे शक्य नसेल तर घरीच मूर्तीची पूजा करावी.

6/7
जागरणाचे महत्त्व: महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाला विशेष महत्त्व आहे. रात्रीच्या चार प्रहरात पूजा केली जाते. पहिल्यांदा उपवास करणाऱ्यांनी किमान रात्री १२ वाजेपर्यंत जागे राहून शिवलीलामृत पोथीचे वाचन किंवा शिव भजन करावे.

7/7
उपवास कधी सोडावा?: उपवास सोडण्याच्या वेळेला 'पारण' म्हणतात. 15 फेब्रुवारीला दिवसभर उपवास केल्यानंतर, 16 फेब्रुवारीच्या सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 या वेळेत उपवास सोडावा. उपवास सोडताना आधी पाणी किंवा हलका आहार घ्यावा, एकदम जड जेवण करू नये. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement