advertisement

Jalna Crime: 6 महिन्यापूर्वी लग्न, डोकं आपटून सासूला संपवलं अन् बुलेटवर झाली फरार, बीडमधील सुनेच्या प्रतापाने जालना हादरलं!

Last Updated:

गोणीत भरलेला मृतदेह उचलता आला नसल्यानं सून तिथेच मृतदेह सोडून फरार झालीये. घरमालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

News18
News18
जालना : सुनेनं सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीत भरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगिता संजय शिनगारे असं या मयत महिलेचं नाव असून शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील ही घटना आहे. भिंतीवर डोकं आपटून हत्या करण्यात आली.
गोणीत भरलेला मृतदेह उचलता आला नसल्यानं सून तिथेच मृतदेह सोडून फरार झालीये.. घरमालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पचंनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान फरार आरोपी सुनेचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी सून एका अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवर बसून घटनास्थळावरून पसार झाली.
advertisement

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा शिनगारे असे आरोपी सूनेचे नाव आहे. मृत सासू सविता यांचा मुलगा सध्या नोकरीनिमित्त लातूरला असतो. सासू आणि सून सध्या दोघीच भाड्याच्या घरात जालन्यात राहत होते. मुलगा सुट्टीच्या दिवशी येऊन भेटत असे. सासू सुनांमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या वादातूनच पहाटे सुनेने सासूचे डोके भिंतीवर आदळले, त्यात सासूचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो एका पोत्यात भरला मात्र तो उचलता न आल्याने सून तिथेच टाकून फरार झाली आहे. शेजारी राहणाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपी सून एका अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवर बसून पसार झाली. त्यानुसार पोलिस सून व बुलेटस्वाराचा शोध घेत आहेत.
advertisement

6 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

विशेष म्हणजे आरोपी सून प्रतीक्षाचा विवाह सहा महिन्यापूर्वी आकाशसोबत झाला होता. शिनगारे कुटुंब हे मुळचे बीडचे आहे मात्र मुलाच्या लग्नानंतर जालना येथे राहण्यासाठी आले होते. आकाश हा लातूर येथे नोकरीला होता. तर सासू आणि सून दोघी जालन्यात भाड्याने राहत होत्या.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Jalna Crime: 6 महिन्यापूर्वी लग्न, डोकं आपटून सासूला संपवलं अन् बुलेटवर झाली फरार, बीडमधील सुनेच्या प्रतापाने जालना हादरलं!
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement