परराज्यातून फिरायला आला, कुटुंबीयांनी फोन केल्यावर घेतला नाही, हॉटेलच्या खोलीत काय घडलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
death news - मयंक पाल असे 44 वर्षांच्या मृत व्यक्तीचे नाव आहे. पश्चिम बंगालहून उत्तराखंडमध्ये पर्यटनाला आलेल्या या व्यक्तीने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. त्याने हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती आणि याचठिकाणी त्याने स्वतःचा गळा चिरून त्याने आत्महत्या केली.
दिक्षा बिश्त, प्रतिनिधी
लालकुआ - गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परराज्यातून फिरायला आलेल्या पर्यटकाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण घटना -
मयंक पाल असे 44 वर्षांच्या मृत व्यक्तीचे नाव आहे. पश्चिम बंगालहून उत्तराखंडमध्ये पर्यटनाला आलेल्या या व्यक्तीने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. त्याने हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती आणि याचठिकाणी त्याने स्वतःचा गळा चिरून त्याने आत्महत्या केली.
advertisement
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला असून कुटुंबीय आल्यानंतर शवविच्छेदन केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयंक पाल (44) असे मृताचे नाव आहे. ही घटना नैनीताल जिल्ह्यातील लालकुआं येथील आहे. मयंक यांनी शुक्रवारी तिराहे रेल्वे स्टेशन याठिकाणी कुणाल हॉटेलमध्ये एक खोली घेतली होती. शुक्रवारी मयंकच्या कुटुंबीयांनी हॉटेलच्या रिसेप्शनवर फोन केला होता आणि मयंक फोन उचलत नसल्याचे सांगितले. यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून आवाज न आल्याने हॉटेलचा दरवाजा उघडण्यात आला.
advertisement
यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्याने हॉटेलच्या खोलीमध्ये जाऊन पाहिले असताना आतील टॉयलेटमध्ये मयंकचा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह सुशिला तिवारी रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र, याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच हॉटेल व्यवस्थापनाच्या वतीने मयंकच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती देण्यात आली.
advertisement
याप्रकरणी लालकुआ येथील पोलीस अधिकारी डीआर वर्मा यांनी सांगितले की, मयंक आपल्या दोन मित्रांसह उत्तराखंडला फिरायला आला होता. मयंकचे दोन मित्र हे अल्मोडा याठिकाणी फिरायला गेले आहेत. तर तो शुक्रवारी बाघ एक्सप्रेसने परत पश्चिम बंगालला परतणार होता. मयंक डिप्रेशनमध्ये होता आणि त्यावर उपाय म्हणून तो औषधीही घेत होता. तो पश्मि बंगालच्या रघुनाथपुर येथील रहिवासी आहे, असेही सांगण्यात आले.
Location :
Uttarakhand (Uttaranchal)
First Published :
November 09, 2024 3:58 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
परराज्यातून फिरायला आला, कुटुंबीयांनी फोन केल्यावर घेतला नाही, हॉटेलच्या खोलीत काय घडलं?