Aqil Akhtar Case : DGP मुस्तफाच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, अकीलचा नवा व्हिडीओ समोर पण शेवटच्या वाक्याने खळबळ!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Aqil Akhtar New Video Viral : माजी पोलीस महासंचालक (DGP) मोहम्मद मुस्तफा यांचा मुलगा अकीलचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्यांनी आपल्या कुटुंबावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
DGP Mohammed Mustafa Son Death Case : पंजाबचे माजी पोलीस महासंचालक (DGP) मोहम्मद मुस्तफा आणि त्यांची पत्नी तथा माजी मंत्री रझिया सुलताना यांच्यासह चौघांविरुद्ध त्यांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी हरियाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुस्तफा यांच्या पत्नी रजिया सुलताना या पंजाबच्या माजी मंत्री आहेत. मोहम्मद मुस्तफा यांच्या मुलाने आपल्या पत्नीचे आणि वडील मोहम्मद मुस्तफा यांचे अनैतिक संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. तसेच कुटुंबाने मिळून आपल्या हत्येचा कट रचल्याचाही दावा त्यांनी केला होता. शेजाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीमुळे अकील अख्तर मृत्यू प्रकरणाला गंभीर वळण लागलं होतं. मात्र आता अकील यांचाच एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
नवीन व्हिडिओ समोर
अकील यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्यांनी आपल्या कुटुंबावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपणच मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतो, असं म्हणत त्यांनी आपल्या वडिलांवरचे आरोप फेटाळल्याचं या व्हि़डीओमध्ये दिसत आहे.
कुटुंबावर केलेले आरोप निराधार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकील यांना त्यांच्या घरात कुटुंबीयांनी बेशुद्ध अवस्थेत पाहिले होते. कुटुंबीयांनी त्यावेळी मृत्यूचे कारण औषधांचा ओव्हरडोज असल्याचे सांगितले होते. आता एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात अकील आपल्या कुटुंबाला क्लीन चिट देताना दिसत आहेत. मी कुटुंबावर केलेले सर्व आरोप निराधार होते आणि मी मानसिकदृष्ट्या ठीक नसताना केले होते, असं अकील म्हणताना दिसत होते. अकिल स्किझोफ्रेनियाने या आजाराने त्रस्त होते.
advertisement
शेवटी ते मला मारतात की काय
माझी बहीण मला औषधं द्यायची. मला वाटायचं की ती मला विष देत आहे, त्यामुळे मी ते घ्यायचो नाही. देवाचे आभार मानतो. मी अशा कुटुंबात जन्माला आलो आहे. पण या व्हिडीओमध्ये आणखी एक ट्विस्ट पहायला मिळतोय. या व्हिडीओच्या शेवटी अकीलने केलेल्या एका वक्तव्यावरून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आयुष्यात काय होतंय ते पाहूया, शेवटी ते मला मारतात की काय, असं अकील म्हणताना दिसतोय.
advertisement
डॉक्टरांनी मृत घोषित केलं
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) यांचा मुलगा अकील अख्तर पंचकुला येथील सेक्टर 4 येथील त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. त्यानंतर आता वाद पेटल्याचं पहायला मिळालं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 10:45 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Aqil Akhtar Case : DGP मुस्तफाच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट, अकीलचा नवा व्हिडीओ समोर पण शेवटच्या वाक्याने खळबळ!