advertisement

सावधान! फॅक्ट्रीमध्ये असं तयार होतं बनावट पनीर; धक्कादायक प्रकार उघड, कारखान्यातून जप्त केलं 58kg पनीर

Last Updated:

पंकज डेअरीमध्ये खाद्य सुरक्षा विभागाने कारवाई करून बनावट पनीर तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. येथे मक्याच्या पीठात...

News18
News18
लग्नाचा सिझन सुरू झाला आहे. लग्न असो वा कोणताही मोठा कार्यक्रम, पनीरचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पण तुम्ही जे पनीर खात आहात, ते खरंच पनीर आहे की तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणारे दुसरे काही, हे तुम्हाला माहीत आहे का? उत्तर प्रदेशमधील बलिया येथे अन्न सुरक्षा आणि औषध विभागाने केलेल्या एका कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बलिया शहराच्या कोतवाली भागात जगदीशपूर येथे असलेल्या पंकज डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्स नावाच्या कारखान्यावर जेव्हा विभागाने छापा टाकला, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. होय, बलियामध्ये कॉर्न पावडरपासून बनावट पनीर बनवण्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. इथे स्किम्ड मिल्क पावडरमध्ये स्टार्च मिसळून पनीर तयार केला जात होता.
छाप्यात बनावट पनीर सापडला, परिसरात भीतीचे वातावरण...
माहिती मिळताच आझमगढ आणि बलिया येथून एक पथक तयार करण्यात आले आणि कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात विभागाला मोठ्या प्रमाणात बनावट पनीर आढळून आलं. विभागाने घटनास्थळावरून सर्व माल जप्त केला आहे. मुख्य अन्न सुरक्षा अधिकारी दिनेश कुमार राय यांनी सांगितले की, खरं पनीर दुधापासून बनतं, पण येथे कॉर्न फ्लोअरपासून पनीर तयार केला जात होतं. हा पनीर आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. पथकाने सुमारे 58 किलो एसएमपी सोबत 15 किलो स्टार्च जप्त केला आहे.
advertisement
असा ओळखा खरा आणि बनावट पनीर...
तज्ञांच्या मते, खरं आणि बनावट पनीर ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी पनीरला गरम पाण्यात टाकून, चोळून किंवा आयोडीन टिंचर वापरून तपासता येते. खरं पनीर पाण्यात विरघळत नाही, तर बनावट पनीर सहज विरघळू शकतो किंवा तुटू शकतो. खऱ्या पनीरची चव किंचित गोड असते, तर बनावट पनीरची चव विचित्र असू शकते. चोळताना तुटण्यासोबतच, बनावट पनीर रबरसारखा ताणला जातो. त्यामुळे आता पनीर खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
सावधान! फॅक्ट्रीमध्ये असं तयार होतं बनावट पनीर; धक्कादायक प्रकार उघड, कारखान्यातून जप्त केलं 58kg पनीर
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement