Akshaya Tritiya 2025 : तब्बल 84 वर्षांना जुळून आलाय योग! 'या' दिवशी खरेदी करा सोनं आणि मुहूर्त न पाहता करा शुभ काम!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
30 एप्रिल 2025 रोजी येणारी अक्षय्य तृतीया अत्यंत विशेष मानली जात आहे. 84 वर्षांनंतर सूर्य आणि चंद्र उच्च राशीत असून, सर्वार्थ सिद्धी योग देखील आहे. यामुळे या वर्षीचा दिवस अतीशय शुभ आहे. या दिवशी
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अक्षय्य तृतीया ही हिंदू धर्मातील सर्वात खास तिथींपैकी एक आहे. पंडित धीरज शर्मा लोकल 18 ला सांगतात की, या तिथीचं महत्त्व हिंदू धर्मात यामुळे वाढतं कारण या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी पंडित किंवा पंचांग पाहण्याची गरज नसते. असं म्हणतात की, या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ कधीही संपत नाही (अक्षय राहते).
advertisement
advertisement
ज्योतिषी पंडित धीरज शर्मा यांच्या मते, या तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सकाळी लवकर उठून दोघांची पूजा करावी. पूजेत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना या दिवशी स्नान घालावं. त्यानंतर त्यांना फळं आणि मिठाई अर्पण करून दोघांची आरती करावी.
advertisement