advertisement

पत्नीनं ‘त्याच्या’सोबत हॉटेल सुरू केलं, पतीला खटकलं, सत्तूर घेतला अन्..., सोलापूर हादरलं!

Last Updated:

Solapur Crime: एका सुखी संसाराचा रागाच्या भरात असा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पत्नीनं ‘त्याच्या’सोबत हॉटेल सुरू केलं, पतीला खटकलं, सत्तूर घेतला अन्..., सोलापूर हादरलं!
पत्नीनं ‘त्याच्या’सोबत हॉटेल सुरू केलं, पतीला खटकलं, सत्तूर घेतला अन्..., सोलापूर हादरलं!
सोलापूर: क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या वादाचे पर्यावसान किती भयानक असू शकते, याचा प्रत्यय सोलापुरातील भवानीपेठ भागात आला आहे. कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पत्नीवर सत्तूरने जीवघेणा हल्ला केल्यानंतर, पतीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. चक्रपाणी सुदर्शन ऐरेणी असे 40 वर्षीय पतीचे नाव असून ते भवानी पेठ परिसरात राहात होते. तर पत्नी प्रवलिका ऐरेणी या गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चक्रपाणी आणि प्रवलिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास प्रवलिका या डबा देण्यासाठी घरी आल्या होत्या. यावेळी दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात चक्रपाणीने सत्तूरने प्रवलिका यांच्या डोक्यावर आणि अंगावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवलिका यांना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून 15 पेक्षा जास्त टाके घालण्यात आले आहेत.
advertisement
प्रवलिका सुदर्शन ऐरेणी या एका खाजगी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी एका ओळखीच्या व्यक्तीसोबत भागीदारीत हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायावरून चक्रपाणी ऐरेणी यांना संशय होता आणि त्यातूनच दोघांमध्ये सतत वाद देखील होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
पश्चात्ताप की भीती?
पत्नीवर हल्ला केल्यानंतर घाबरलेल्या किंवा पश्चात्ताप झालेल्या चक्रपाणीने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. एका सुखी संसाराचा रागाच्या भरात असा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
पत्नीनं ‘त्याच्या’सोबत हॉटेल सुरू केलं, पतीला खटकलं, सत्तूर घेतला अन्..., सोलापूर हादरलं!
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement