आधी प्रेम विवाहाला विरोध, नंतर १ वर्षाचा सुखी संसार, मेहुण्याकडून भाऊजीचा खून, बार्शीतील घटना
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Barshi News: बार्शी तालुक्यात प्रेम विवाहाला विरोध करत मेहुण्याकडून भाऊजीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : बार्शी तालुक्यात प्रेम विवाहाला विरोध असल्याने मेहुण्याकडून भाऊजीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पांगरी येथील एका हॉटेलच्या खोलीत मेहुण्याने भाऊजीच्या डोक्यात काचेची बाटली फोडून ठार केल्याचा प्रकार घडला.
बार्शी तालुक्यातील पांगरी येथील ही घटना आहे. 28 जानेवारी रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. सुशील क्षीरसागर असे खून झालेल्या भाऊजीचे नाव आहे तर ऋषिकेश क्षीरसागर असे खून केलेल्या मेहुण्याचे नाव आहे.
एक वर्षापूर्वी प्रेमविवाह, घरातील सदस्यांना विवाह मान्य नव्हता
पांगरी पोलीस ठाण्यात ऋषिकेश क्षीरसागर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशील क्षीरसागर आणि ऋषिकेश याची बहीण रेश्मा हिचा प्रेमविवाह एक वर्षांपूर्वी झाला होता. घरातील काही सदस्यांना हा विवाह मान्य नव्हता.
advertisement
जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले, कुठल्याशा कारणावरून वाद, डोक्यात बाटली फोडून खून केला
सुशील आणि रेश्मा कामानिमित्ताने पुणे येथे स्थायिक झाले होते. 23 जानेवारी रोजी कार्यक्रम असल्यामुळे सुशील आणि रेश्मा हे येरमाळा येथे आले होते. 28 जानेवारी रोजी घरातील सुशील, रेश्मा आणि ऋषिकेश यांच्यासह घरातील मंडळी जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळेस सुशील आणि ऋषिकेश याचे भांडण झाले आणि त्यातून ऋषिकेश याने सुशील याच्या डोक्यात बाटली फोडून वार करत त्याला ठार केले. सुशील याला पांगरी येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 3:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी प्रेम विवाहाला विरोध, नंतर १ वर्षाचा सुखी संसार, मेहुण्याकडून भाऊजीचा खून, बार्शीतील घटना








