advertisement

तोल सुटला अन् 28 सेकंदात सगळं संपलं, तलावात कोसळले 2 पॅराग्लायडर्स, काळजाचा ठोका चुकवणारे PHOTO

Last Updated:
टिहरीतील 'एक्रो फेस्टिव्हल आणि SIV चॅम्पियनशिप २०२६'मध्ये दोन पायलट पॅराग्लायडिंग करताना तलावात कोसळले, SDRFने तातडीने रेस्क्यू करून जीव वाचवला.
1/7
आकाशातून उंच उडून जमिनीवरचा नयनरम्य नजारा पाहायला कुणाला आवडणार नाही, अर्थात त्याची मजा काही वेगळीच असते, ज्याला थ्रील आवडतं तो पॅराग्लायडिंगची मज्जा अनुभवण्याची संधी सोडत नाही. मात्र ते करत असताना थोडी जरी चूक झाली तरी जीवावर बेतू शकते. अशीच एक थरकाप उडवणारी घटना समोर आली.

2/7
तोल गेला आणि 28 सेकंदात होत्याचं नव्हत झालं. पॅराग्लायडिंग करणारे दोघे जण खाली तलावात कोसळले, हे सगळं इतक्या वेगानं घडलं की त्यांना स्वत:ला सावरण्याची संधीच मिळाली नाही. या संपूर्ण घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

3/7
उत्तराखंडमधील टिहरी इथे आयोजित 'एक्रो फेस्टिव्हल आणि SIV चॅम्पियनशिप २०२६' दरम्यान काळजाचा ठोका चुकला. पॅराग्लायडिंग करत असताना दोन जण अचानक नियंत्रण सुटल्यामुळे टिहरी सरोवराच्या अथांग पाण्यात कोसळले. सुदैवाने, तिथे तैनात असलेल्या SDRF च्या पथकाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून दोन्ही पायलटना सुखरूप बाहेर काढले.

4/7
आंतरराष्ट्रीय स्तरावरील या चॅम्पियनशिपमध्ये देश-विदेशातील नामांकित पॅराग्लायडर सहभागी झाले आहेत. बुधवारी दोन्ही पायलट हवेत झेपावले होते, मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा हवेतील समतोल बिघडला. बघता बघता त्यांचे पॅराग्लायडर सरोवराच्या दिशेने झेपावले आणि ते पाण्यात कोसळले. हा प्रकार पाहून उपस्थितांमध्ये मोठी घबराट पसरली होती.

5/7
अशा साहसी क्रीडा स्पर्धांमध्ये दुर्घटना घडण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने आधीच SDRF च्या विशेष तुकड्या तैनात केल्या होत्या. पायलट पाण्यात कोसळताच SDRF च्या जवानांनी वेळ न घालवता रेस्क्यू बोट आणि अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने सरोवरात धाव घेतली. अत्यंत वेगाने हालचाली करत जवानांनी दोन्ही पायलटना पाण्याबाहेर काढले.

6/7
पाण्यातून बाहेर काढल्यानंतर दोन्ही पायलटची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सुदैवाने त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सुरक्षित स्थानी हलवण्यात आले. या धाडसी कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासन आणि आयोजकांनी SDRF च्या जवानांचे विशेष कौतुक केले आहे.

7/7
तांत्रिक बिघाडामुळे ही स्थिती ओढवली असली तरी, सुरक्षा यंत्रणेच्या तत्परतेमुळे या आंतरराष्ट्रीय महोत्सवावर ओढवलेले मोठे संकट टळले आहे. मात्र असे थ्रील करताना ते जीवावर बेतणार नाहीत याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.

अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement