राजकारणापलीकडची जिगरी दोस्ती! नाना पाटेकरांच्या लेकाने शेअर केले अजित पवारांचे अनसीन फोटो, पोस्ट वाचून रडू येईल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ajit Pawar: सध्या सोशल मीडियावर अजित पवार यांच्याबद्दलच्या पोस्ट्सचा महापूर आला असतानाच, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे सुपुत्र मल्हार पाटेकर याने शेअर केलेले काही दुर्मिळ फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हे फोटो शेअर करताना मल्हारने एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. तो म्हणतो, "माननीय अजित दादा पवार साहेबांचे जाणे हे आमच्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. ते आमच्यासाठी कुटुंबाचाच एक भाग होते आणि आयुष्यभर राहतील. त्यांच्यासोबतच्या त्या अविस्मरणीय आठवणी आज मनाला चटका लावून जात आहेत. ही कधीही भरून न येणारी पोकळी आहे."
advertisement
advertisement
advertisement
२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या भयानक अपघातात महाराष्ट्राने आपला हक्काचा माणूस हिरावला. काल त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. राजकीय नेत्यांपासून ते सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत प्रत्येकाने दादांना मानाचा मुजरा केला.








