advertisement

Bigg Boss Marathi 6 Elimination: सहाव्या आठवड्यामध्ये सचिन कुमावतला मिळाला घरचा नारळ

Last Updated:

बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्यातून सचिन कुमावत या स्पर्धकाला घरचा नारळ मिळाला आहे. रोशन, रूचिता आणि सचिन हे तीन स्पर्धक डेंजर झोनमध्ये गेले होते.

News18
News18
सहाव्या आठवड्यामध्ये, कोणता स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. आता अखेर तो क्षण समोर आला आहे. सहाव्या आठवड्यामध्ये रोशन, सागर, राकेश, दीपाली, अनुश्री, रुचिता, सचिन, प्रभू आणि प्राजक्ता असे नऊ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. या स्पर्धकांमधून तीन स्पर्धक डेंजर झोनमध्ये तर उर्वरित सहा स्पर्धक सेफ झोनमध्ये गेले आहेत. रोशन, रूचिता आणि सचिन हे तीन स्पर्धक डेंजर झोनमध्ये गेले होते. या तिघांमधून सचिन कुमावत हा स्पर्धक आता एलिमिनेट झाला आहे. सहाव्या आठवड्यातून सचिन कुमावतचं एलिमिनेशन झालं आहे.
सहाव्या आठवड्यामध्ये, रोशन, सागर, राकेश, दीपाली, अनुश्री, रुचिता, सचिन, प्रभू आणि प्राजक्ता असे नऊ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. अहिराणी गाण्यासाठी प्रसिद्ध असलेले सचिन कुमावत बिग बॉसच्या घरातून बाहेर आलेले आहेत. बिग बॉसच्या घरातील त्यांचा खेळ म्हणावा तितका स्ट्राँग नसल्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं आहे. प्रत्येक स्पर्धकासोबत त्यांचे नाते खूप चांगले असली तरीही त्यांनी स्वत:साठी स्टँड न घेतल्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले आहे. घरातल्या स्पर्धकांनीच नाही तर, प्रेक्षकांनीही त्यांना कमी मत देत त्यांचा बिग बॉसच्या घरातला प्रवास इथेच संपला आहे.
advertisement
सध्या बिग बॉसच्या घरामध्ये 12 ते 13 स्पर्धक आहेत. आता अशातच येत्या आठवड्यात एक नवीन वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. नेमकं हा स्पर्धक कोण असेल? याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या स्पर्धकाची बिग बॉसच्या घरात केव्हा एन्ट्री होणार? याबद्दलची अपडेट रितेश भाऊने स्पर्धकांना दिलेली नाही. आज बिग बॉसच्या घरात 'भाऊच्या धक्का'वर रितेश भाऊने काही स्पर्धकांमध्ये चुगली लावली आहे. अर्थातच या माध्यमातून स्पर्धकांना आपल्या पुढच्या खेळाची स्ट्रेटेजी तयार करावी लागणार आहे. या पुढचा सर्व स्पर्धक आपला खेळ कशा पद्धतीने खेळतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 Elimination: सहाव्या आठवड्यामध्ये सचिन कुमावतला मिळाला घरचा नारळ
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement