advertisement

Weather Alert: महाराष्ट्रात अचानक वारं फिरलं, आता विजा कडाडणार, 48 तासांसाठी यलो अलर्ट

Last Updated:
Weather Alert in Marathi: महाराष्ट्रात थंडीचा जोर ओसरला असून उन्हाचा चटका वाढला आहे. अशातच हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
1/7
.महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांत मोठे बदल जाणवत आहेत. थंडीचा जोर ओसला असून उन्हाचा चटका वाढला आहे. काही ठिकाणी उष्णतेचा पारा 37 अंशांच्या पार गेला आहे. अशातच आता राज्यावर नवं संकट घोंघावत आहे. काही भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. 23 फेब्रुवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/7
मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सह कोकणात मुख्यतः ढगाळ आकाश राहील. मुंबईत कमाल तापमान 31-33 अंश आणि किमान 23-25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. रत्नागिरीसारख्या भागांत 34-36°C पर्यंत तापमान वाढू शकते. आज पावसाची शक्यता कमी आहे. समुद्रकिनारी भागांत उष्ण आणि दमट हवामान जाणवेल.

3/7
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत उष्णता वाढत आहे. पुण्यात कमाल 33-35 अंश, तर काही भागांत 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता कमी आहे. दुपारी उन्हाचा तडाखा जाणवेल. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी.

4/7
उत्तर महाराष्ट्रात तापमान सर्वाधिक वाढलेले दिसते. नाशिकमध्ये कमाल 32-34°C, तर मालेगावसारख्या भागांत 35°C पेक्षा जास्त राहील. किमान तापमान 18-20°C राहील. कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.

5/7
मराठवाड्यात उष्ण आणि कोरडे हवामान राहील. कमाल तापमान 34-36°C पर्यंत तर परभणी, बीडमध्ये 33-35°C नोंदवले जाऊ शकते. काही ठिकाणी हलका अवकाळी पाऊस किंवा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहील.

6/7
विदर्भात राज्यातील सर्वाधिक उष्णता जाणवेल. चंद्रपूरमध्ये 36-37°C पर्यंत कमाल तापमान जाईल. तसेच चंद्रपुर आणि गडचिरोलीत विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस होईल. त्यामुळे पुढील 48 तासांसाठी काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोला, अमरावतीत 35-36°C कमाल तापमान तर 18-22°C किमान तापमान राहील. उष्णतेच्या लाटेची सुरुवात जाणवत आहे, पण अद्याप हीट वेव्हचा अलर्ट नाही.

7/7
एकंदरीत, 23 फेब्रुवारीला महाराष्ट्रात उन्हाळ्याचा जोर वाढत आहे. काही भागांत अवकाळी पावसाचे सावट असले तरी बहुतेक ठिकाणी कोरडे आणि उष्ण दिवस राहतील. लोकांनी भरपूर पाणी प्यावे, थेट सूर्यप्रकाश टाळावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी.

SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement