advertisement

T20 World Cup : आकडे ओरडत होते, तरी सूर्याने ऐकलं नाही... दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा 'जुगार' महागात पडला!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात केली, पण त्यानंतर भारतीय बॉलरनी निराशाजनक कामगिरी केली.

आकडे ओरडत होते, तरी सूर्याने ऐकलं नाही... दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा 'जुगार' महागात पडला!
आकडे ओरडत होते, तरी सूर्याने ऐकलं नाही... दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा 'जुगार' महागात पडला!
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात केली, पण त्यानंतर भारतीय बॉलरनी निराशाजनक कामगिरी केली. 4 ओव्हरमध्ये 20 रनवर दक्षिण आफ्रिकेच्या 3 विकेट गेल्या होत्या. क्विंटन डिकॉक, एडन मार्करम आणि रेयान रिकलटन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. डिकॉक 6 रनवर, मार्करम 4 रनवर आणि रेयान रिकलटन 7 रनवर आऊट झाले.
सुरूवातीलाच 3 विकेट गेल्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि डेव्हिड मिलर यांनी भारतीय बॉलिंगवर आक्रमण केलं. डेव्हिड मिलरने 26 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. मिलरने 35 बॉलमध्ये 180 च्या स्ट्राईक रेटने 63 रनची वादळी खेळी केली, ज्यात 3 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता. तर डेवाल्ड ब्रेविसने 29 बॉलमध्ये 155.17 च्या स्ट्राईक रेटने 45 रनची खेळी केली, त्याने 3 फोर आणि 3 सिक्स लगावले. मिलर आणि ब्रेविस यांच्यात 50 बॉलमध्ये 97 रनची पार्टनरशीप झाली. यानंतर बॅटिंगला आलेल्या स्टब्सने 24 बॉलमध्ये 3 सिक्स आणि एका फोरसह 44 रन केले, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 187 रन केल्या.
advertisement
भारताकडून जसप्रीत बुमराहला 3 तर अर्शदीप सिंगला 2 विकेट मिळाल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेने वरुण चक्रवर्तीच्या 4 ओव्हरमध्ये 47 रन, हार्दिक पांड्याच्या 4 ओव्हरमध्ये 45 रन आणि शिवम दुबेच्या 2 ओव्हरमध्ये 32 रन काढल्या.

टीम इंडियाकडून आकड्यांकडे दुर्लक्ष

टी-20 वर्ल्ड कप किंवा कोणत्याही स्पर्धेमध्ये टीम ही प्रत्येक खेळाडूचं रेकॉर्ड, त्याचा विक पॉईंट आणि स्ट्रेन्थ बघून मैदानात उतरते. डेवाल्ड ब्रेविसला कोणत्या बॉलसमोर अडचणींचा सामना करावा लागतो, हे टीम इंडियाला चांगलं माहिती होतं, तरीही त्यांनी ब्रेविससमोर वेगळी रणनीती का वापरली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement
एसए टी-20 च्या 2025-26 च्या मोसमापासून डेवाल्ड ब्रेविसने फूल लेन्थ बॉलिंगसमोर (6 मीटरपेक्षा कमी) 43 बॉलमध्ये 80 रन केल्या, ज्यात तो एकदाही आऊट झाला नाही. तर गुड लेन्थ बॉलिंगसमोर (6-8 मीटर) ब्रेविसने 50 बॉलमध्ये 39 रन केले. गुड लेन्थ बॉलवर ब्रेविस दोनदा आऊट झाला. तर शॉर्ट लेन्थ बॉलिंग (8 मीटरपेक्षा जास्त) समोर ब्रेविसने 87 बॉलमध्ये 148 रन केले. तसंच शॉर्ट लेन्थ बॉलिंगवर ब्रेविस तब्बल 7 वेळा आऊट झाला.
advertisement
डेवाल्ड ब्रेविसला शॉर्ट बॉलिंग खेळताना अडचणींचा सामना करावा लागतो, हे माहिती असूनही टीम इंडियाने त्याला टप्प्यात बॉल टाकले. अखेर शिवम दुबेने ब्रेविसला शॉर्ट लेन्थचा बॉल टाकला आणि पूल शॉट मारण्याच्या नादात ब्रेविसने अभिषेक शर्माला कॅच दिला. टीम इंडियाने सुरूवातीलाच ब्रेविसला शॉर्ट लेन्थ बॉलिंग केली असती, तर कदाचित त्याला एवढा मोठा स्कोअर करता आला नसता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : आकडे ओरडत होते, तरी सूर्याने ऐकलं नाही... दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा 'जुगार' महागात पडला!
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement