advertisement

लातूरमध्ये ‘ऑपरेशन ऑल आऊट’चा धडाका, शहरभर कडक नाकाबंदी, प्रकरण नेमकं काय?

Last Updated:
वाहतूक नियमांचे पालन करा आणि संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्या, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.
1/5
लातूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांकडून ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत विशेष मोहीम राबवण्यात आली.

2/5
पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक, शिवाजीनगर, विवेकानंद चौक आणि एमआयडीसी परिसरात एकाचवेळी कडक नाकाबंदी करण्यात आली.

3/5
या कारवाईत हुल्लडबाजी, ट्रिपल सीट, विनापरवाना वाहन चालवणे या सारख्या प्रकारांवर एकूण २२ प्रकरणे नोंदवत सुमारे ३५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. एमआयडीसीत २८ वाहनांवर कारवाई; फटाका सायलेन्सर लावलेल्या तीन बुलेट आणि ट्रिपल सीटची तीन वाहने जप्त.

4/5
शिवाजीनगरमध्ये २८ वाहनांवर २४ हजारांचा दंड, तर विवेकानंद चौकात ८ केसेस नोंदवत ५,५०० रुपयांची वसुली करण्यात आली. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकावर गुन्हाही दाखल करण्यात आला. लातूर शहरातील प्रमुख चौक, प्रवेशद्वारांवर तपासणी वाढवण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ट्युशन परिसरातही गस्त वाढवण्यात आली आहे.

5/5
वाहतूक नियमांचे पालन करा आणि संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्या, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे. गुन्हेगारांना सोडणार नाही, कुणी दंगा मस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायद्याचा दणका देऊ, असा इशारा लातूर पोलिसांनी दिला.

SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement