advertisement

आधी कॅन्सरशी लढा, आता दीपिका कक्करच्या आयुष्यात नवं संकट! मध्यरात्री अभिनेत्री रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?

Last Updated:
Dipika Kakkar : गेल्या वर्षी यकृताच्या कर्करोगासारख्या भीषण आजारावर मात करून दीपिका पुन्हा सावरत असतानाच, आता एका नवीन आजाराने डोकं वर काढलं आहे.
1/7
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर हिच्या चाहत्यांसाठी एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी यकृताच्या कर्करोगासारख्या भीषण आजारावर मात करून दीपिका पुन्हा सावरत असतानाच, आता एका नवीन आजाराने डोकं वर काढलं आहे.

2/7
मध्यरात्री अचानक पोटात असह्य वेदना सुरू झाल्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, ज्यामुळे इब्राहिम कुटुंब पुन्हा एकदा चिंतेच्या सावटाखाली आले आहे. दीपिकाचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिम याने आपल्या व्लॉगद्वारे ही माहिती दिली.

3/7
शोएब म्हणाला,
शोएब म्हणाला, "काल रात्रीपर्यंत सगळं काही सुरळीत होतं. आम्ही अक्रमच्या घरून आलो आणि निवांत बसलो होतो. दीपिकाला दोन दिवसांपासून पोटात थोडं दुखत होतं, पण रात्री अचानक ती कळ इतकी वाढली की आम्हाला धावत डॉक्टरकडे जावं लागलं."
advertisement
4/7
डॉक्टरांनी तातडीने सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला आणि त्यात धक्कादायक वास्तव समोर आलं. सीटी स्कॅनमध्ये दीपिकाच्या पोटात 13 mm आकाराची एक गाठ (Cyst) आढळली आहे.
डॉक्टरांनी तातडीने सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला आणि त्यात धक्कादायक वास्तव समोर आलं. सीटी स्कॅनमध्ये दीपिकाच्या पोटात 13 mm आकाराची एक गाठ (Cyst) आढळली आहे.
advertisement
5/7
शोएबने सांगितलं की,
शोएबने सांगितलं की, "गेल्या वेळी जेव्हा तिचं ऑपरेशन झालं होतं, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिचा ट्यूमर खूप अ‍ॅग्रेसिव्ह होता, त्यामुळे तो पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या रक्ताच्या चाचणीत AFP लेव्हल थोडी वाढलेली दिसत आहे, जी साधारणपणे १० असायला हवी पण १२ आली आहे."
advertisement
6/7
सध्या डॉक्टरांनी याला सिस्ट असंच म्हटलं असून, एका लहान प्रोसीजरच्या माध्यमातून ही गाठ जळवून करण्यात येणार आहे. यासाठी दीपिकाला ३ ते ४ दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे.
सध्या डॉक्टरांनी याला सिस्ट असंच म्हटलं असून, एका लहान प्रोसीजरच्या माध्यमातून ही गाठ जळवून करण्यात येणार आहे. यासाठी दीपिकाला ३ ते ४ दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे.
advertisement
7/7
आपल्या प्रकृतीबद्दल बोलताना दीपिका थोडी भावूक झाली. ती म्हणाली,
आपल्या प्रकृतीबद्दल बोलताना दीपिका थोडी भावूक झाली. ती म्हणाली, "दोन दिवसांपासून पोटात आणि खांद्यात खूप दुखत होतं. जेव्हा खांद्यात दुखायला लागलं, तेव्हा आम्ही घाबरलो कारण कर्करोगाच्या वेळीही असंच लक्षण होतं. सुदैवाने, सीटी स्कॅनमध्ये यकृतामध्ये काहीही दोष आढळलेला नाही, हीच एक मोठी दिलासादायक बातमी आहे. पोटातलं दुखणं आणि सिस्टवर आता उपचार सुरू होतील."
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement