अजितदादांचा १२ वा अर्थसंकल्प ठरला असता पण.... अधिवेशनाआधी सुनेत्रा पवार भावुक
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अधिवेशनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मुंबई : अजितदादा पवार यांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत कधीही तडजोड केली नाही. दादांच्या कार्यकाळात राज्याची आर्थिक घडी लागली. ते अत्यंत शिस्तप्रिय होते. त्यांनी आतापर्यंत ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यंदा त्यांचा १२ वा अर्थसंकल्प ठरला असता. अर्थसंकल्पावर त्यांचे काम पूर्णही झाले होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. दादा आपल्यात नाहीत पण त्यांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे, असे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
अधिवेशनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांच्याविना होणारे ३५ वर्षांतले हे पहिलेच अधिवेशन असेल. अजित पवार यांचे राज्याच्या विकासात असलेले अग्रणी स्थान सुनेत्रा पवार यांनी अधोरेखित केले. दादांच्या आठवणी सांगताना सुनेत्रा पवार भावनिक झाल्या होत्या.
अजितदादांचा १२ वा अर्थसंकल्प ठरला असता पण....
advertisement
सुनेत्रा पवार म्हणाल्या, "अजितदादांनी आर्थिक शिस्तीत कधीही तडजोड केली नाही. अजितदादांनी ११ वेळा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत नेते वानखेडे साहेबांनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा मान दादांना मिळाला. यंदाचा अर्थसंकल्प हा त्यांच्या काळातला १२ वा अर्थसंकल्प ठरला असता. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते, अचानक ते आपल्याला सोडून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला विकसित भारत करण्यासाठी अजितदादा झटायचे. त्यांच्या माघारी यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार आहेत. माझे हे पहिलेच अधिवेशन आहे. अधिवेशन व्यवस्थित पार पडेल, अशी आशा आहे".
advertisement
अर्थसंकल्प म्हटले की सगळ्यांचे लक्ष अजितदादांकडे असायचे-एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार हे अत्यंत शिस्तप्रिय नेते होते. त्यांच्याएवढी आर्थिक शिस्त मी पाहिली नाही. अधिवेशन आणि अर्थसंकल्प म्हटले की अजित पवार यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष असायचे. पण अजित पवार यांच्यावर नियतीने अन्याय केला. दादा आज आपल्यात नाहीत. पण राज्याच्या विकासाचे त्यांचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 7:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांचा १२ वा अर्थसंकल्प ठरला असता पण.... अधिवेशनाआधी सुनेत्रा पवार भावुक






