'दम नाही का तुमच्यात?' सुरज चव्हाणवर DP दादाचा संताप, ट्रोल करणाऱ्यांनाही चांगलंच खडसावलं, पण असं घडलं काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhananjay Powar Video: सुरजचा मित्र आणि सहस्पर्धक धनंजय पोवार ऊर्फ डीपी दादा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. आता या संपूर्ण वादावर डीपी दादाने एक लांबलचक व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
मुंबई: 'बिग बॉस मराठी' सीझन ५ संपून बराच काळ झाला असला तरी, स्पर्धकांमधील संबंध अजूनही चर्चेत आहेत. विजेता ठरलेला रीलस्टार सुरज चव्हाण नुकताच विवाहबंधनात अडकला आणि त्याच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल झाले. मात्र, या नवीन घरात सोफासेट कोणी दिला, यावरून सुरजचा मित्र आणि सहस्पर्धक धनंजय पोवार ऊर्फ डीपी दादा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. आता या संपूर्ण वादावर डीपी दादाने एक लांबलचक व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे आणि थेट सुरजलाच प्रश्न विचारले आहेत.
सोफासेट देण्याचे आश्वासन, पण...
'बिग बॉस'च्या घरात असताना डीपी दादाने सुरजला वचन दिले होते की, तो त्याच्या नवीन घरात सोफासेट भेट देईल. पण सुरजच्या नवीन घराचे फर्निचर समोर आल्यावर तो सोफासेट दुसऱ्याच कोणीतरी दिल्याचं उघड झालं. यानंतर, 'डीपी दादाने बिग बॉसमध्ये फक्त मतांसाठी आश्वासन दिले' असे म्हणत सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जाऊ लागले. ट्रोलिंगला कंटाळून डीपी दादाने ८ मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करत, झालेला प्रकार सविस्तर सांगितला आहे.
advertisement
डीपी दादाने उघड केला संपूर्ण घटनाक्रम
धनंजनने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केला आहे. धनंजय म्हणाला, "सूरजला बाहेरून सोफा मिळाला, त्याने तो घेतला. त्याने मला फोन करून विचारले होते, पण बाहेरून सोफा घेतला असेल तर त्याने मला कळवायला पाहिजे होते. मी त्याला ३-४ वेळेस कॉल केले. 'अॅड्रेस पाठव', 'सोफा बघायला येतोस का', 'हॉलचे माप सांग' असे विचारले होते. पण त्याने लग्नाच्या आदल्या रात्री मला पत्ता पाठवला. इतकेच काय, तर मी त्याला 'लग्नाची गडबड आहे, २-३ दिवस जाऊ दे, नंतर पाठवतो' असे म्हणालो, तेव्हा तो 'हा' बोलला होता. कदाचित आज त्याला कोणीतरी जास्त देत असेल म्हणून तो मला विसरला का?" असा थेट आणि भावनिक प्रश्न डीपी दादाने उपस्थित केला.
advertisement
नेटकऱ्यांना धरलं धारेवर
डीपी दादाने टीकाकारांना झापताना आपली खंतही व्यक्त केली. तो म्हणाला, "मी पुण्याच्या पार्टीला सांगून सोफा तयार करून घेतलेला. पण आज लोक कमेंट करतात की मतांसाठी हे सगळं केलं. आज आम्ही जे काही आहोत, ते स्वतःच्या हिंमतीवर आहोत. त्याला माझ्याकडून नको असेल, तर मी काय करू? त्याने पण आम्हाला किंमत द्यायला पाहिजे. त्याने स्वतःहून सांगायला पाहिजे. मला का विचारताय तुम्ही? त्याने मला सांगितलं नाही. याचा जाब सूरजला विचारा ना!" असे स्पष्टपणे म्हणत डीपी दादाने ट्रोलर्सना आव्हान दिले आहे.
advertisement
डीपी दादाने आजही सोफासेट द्यायला तयार असल्याचे सांगितले आहे. मात्र, या सोफासेट वादामुळे 'बिग बॉस'च्या या दोन मित्रांमधील संबंधात कटुता आल्याचे स्पष्ट झाले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 08, 2025 7:37 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'दम नाही का तुमच्यात?' सुरज चव्हाणवर DP दादाचा संताप, ट्रोल करणाऱ्यांनाही चांगलंच खडसावलं, पण असं घडलं काय?


